शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

तासगाव ‘बिनविरोध’ नाहीच

By admin | Updated: March 28, 2015 00:05 IST

नऊजण रिंगणात : सुमनताई पाटील यांना भाजप बंडखोराचे आव्हान

सांगली : राज्याचे लक्ष लागलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या उमेदवार, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याविरोधात आठ अपक्ष रिंगणात असल्याचे शुक्रवारी(दि. २७) अर्ज माघारीच्या अखेरच्या मुदतीनंतर स्पष्ट झाले. अपक्षांमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा समावेश असून, त्यांना माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते.आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने सुमनताई पाटील यांची उमेदवारी जाहीर करून सर्व पक्षांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पतंगराव कदम यांनी त्यासाठी प्रयत्न केले. या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस, शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, शेकापसह भाजपनेही तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत (दि. २४) सुमनताई यांच्यासह १९ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात अपक्षांचाच भरणा होता. त्यामुळे राष्ट्रवादीने सर्व अपक्षांची मनधरणी सुरू केली होती. राष्ट्रवादीकडून डमी अर्ज भरणाऱ्यांनी माघार घेतल्याने कालअखेर १६ अर्ज राहिले होते.राष्ट्रवादीची सूत्रे बाजार समितीतूनतासगावच्या बाजार समिती परिसरातील दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसची सूत्रे हलविली जात होती. सकाळपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात गर्दी केली होती.दुपारी दोननंतर आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर हालचालींना गती आली.