शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अंदाज, तर्कवितर्कांना उधाण

By admin | Updated: October 16, 2014 22:53 IST

दोघांतच लढत : कार्यकर्त्यांमध्ये पैजा

अमित काळे -- तासगाव --अत्यंत चुरशीने झालेल्या व लक्षवेधी असणाऱ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. झालेल्या मतदानावरुन बुधवारी रात्रीपासूनच राजकीय कार्यकर्त्यांत आकडेमोड सुरू झाली आहे. वाढलेला मतदार, त्याचप्रमाणे झालेले अभूतपूर्व मतदान पाहता, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मतदारसंघात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांना जबरदस्त यश मिळाल्यानंतर थोड्याच कालावधीनंतर झालेली ही विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची तसेच लक्षवेधी ठरली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. रविवार, दि. १९ रोजी मतदान यंत्रातून दोन माजी मंत्र्यांबाबत मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे.मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश असल्याने सध्या मतदानाची सुरु असणारी बेरीज, वजाबाकी तालुका पातळीवर होत आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) व माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (भाजप) यांच्यातील प्रमुख लक्षवेधी लढतीत कोण कसे मतदान घेणार, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.आर. आर. पाटील हे मूळ तासगाव तालुक्यातील, तर अजितराव घोरपडे हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे हेही शेंडगे घराण्यातील आहेत. एकूण झालेल्या मतदानात खास करुन धनगर समाजाच्या मतदानाबाबत विशेष चर्चा होत आहे. धनगर समाजाचे मतदान जास्त आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. शेवटपर्यंत चुरसही जाणवत होती. मतदानादिवशी सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त मतदान झाले. शहरी भागात दुपारी १२ पर्यंत सुमारे ५०-५५ टक्के मतदान झाले होते. मतदारांची उत्स्फूर्तता जाणवत होती. त्यामुळे एकूण मतदान ७७ टक्क्यापर्यंत जाऊ शकले. प्रशासनाने मतदार जागृतीत घेतलेली भूमिका, माध्यमांमधून झालेल्या आवाहनामुळेच हे मतदान झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभाविकच निकालाबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. नगरपरिषद क्षेत्रासह मतदारसंघातील जिल्हा परिषद गटनिहाय झालेल्या मतदानावरुन बेरीज, वजाबाकीची आकडेमोड व अंदाजित टक्केवारी सध्या चर्चेत आहे. गावा-गावात चौका-चौकांमध्ये सध्या हाच विषय चर्चिला जात असल्याचे चित्र आहे. सुरुवातीस लढत चौरंगी-पंचरंगी वाटत होती. परंतु मैदान दुरंगीच झाले. आर. आर. पाटील आणि अजितराव घोरपडे या दोघांच्याचबाबतीत ही आकडेमोड सुरू आहे. कार्यकर्त्यांत पैजा लागत आहेत. वृत्तवाहिन्यांवरचे सर्व्हे, सट्टाबाजार याकडेही लक्ष आहे.मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून आक्रमक पद्धतीने प्रचार झाला. गावोगावी नेत्यांचे होणारे दौरे, प्रचार सभा, पदयात्रांनी दोन्ही तालुके दणाणून गेले होते. एकूण ७७ टक्के चुरशीने मतदान झाले. प्रशासनाची मतदार जागृतीची आग्रही भूमिका, तसेच विविध प्रसारमाध्यमांनी केलेल्या आवाहनामुळे टक्केवारी वाढली.