शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पोहण्यासाठी कासवाला प्लास्टिकचे पाय

By admin | Updated: February 3, 2017 23:10 IST

डहाणूतील कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्रात दोन्ही पाय गमावलेल्या कासवाला प्लास्टिकचे पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला

अनिरुद्ध पाटील/ऑनलाइन लोकमतपालघर/डहाणू दि. 3 - डहाणूतील कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्रात दोन्ही पाय गमावलेल्या कासवाला प्लास्टिकचे पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. डॉ. दिनेश विन्हेलकर यांनी ही किमया साधली आहे. या प्रयोगामुळे आगामी काळात ही उपचार पद्धती विकसित होऊन प्राण्यांवर कृत्रिम अवयव बसवले जाऊ शकतात. त्या दृष्टीने अवयव गमावलेल्या प्राण्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.डहाणू वनविभागाच्या पारनाका येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात कासव पुनर्वसन व संवर्धन केंद्राची उभारणी सहा वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिले केंद्र आहे. वन विभाग आणि वाईल्डलाईफ कन्झर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेयर असोसिएशन या प्राणीमित्र संघटनेद्वारे केंद्राचे कामकाज पाहिले जाते. पालघर जिल्ह्यातील विविध भागातून जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राण्यांवर मुंबईतील पशुवैद्य डॉ. दिनेश विन्हेलकर येथे उपचार करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते अविरत सेवा देत आहेत. डहाणू समुद्रकिनारी जखमी अवस्थेत सापडणार्‍या समुद्री कासवांचे प्रमाण प्रतिवर्षी किमान 35 ते 40 आहे. पुढील दोन्ही पाय गमावलेले कासव या पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अनेक दिवस उपचार केल्यानंतर प्रकृती स्थिरावली होती. दरम्यान त्या कासवाला कृत्रिम पाय लावण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. मात्र डाव्या पायाचा सांधा पूर्णतः निकामी झाल्याने प्लास्टिक पाया जोडणे अशक्य होते. तथापि उजव्या बाजूचा पर्याय वापरण्यात आला. त्यानुसार पायाच्या आकारमानाप्रमाणे प्लास्टिक पाय बसवण्यात आला. जो जोडता तसेच काढता येऊ शकतो. जयपूर फूटप्रमाणे त्याची रचना आणि कार्य आहे. प्लास्टिक पाय जोडल्यानंतर कासव पोहण्यासह दिशा बदलून मार्गक्रमण करण्यास यशस्वी ठरल्याचे निरीक्षण डॉ. दिनेश विन्हेलकर यांनी नोंदवले आहे. मात्र खोल समुद्रात त्याला सोडता येणे अशक्य असून, थोड्या वेळेसाठी हा प्लास्टिक पाय बसवणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रयोगामुळे अवयव गमावलेल्या प्राण्यांना कृत्रिम अवयव बसवल्यास थोड्या कालावधीसाठी एका जागेवरून हलणे शक्य होणार आहे. "सदर प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अवयव गमावलेल्या अन्य प्राण्यांना त्याचा लाभ देता येईल. प्राथमिक अवस्थेतील हा टप्पा असून सुधारण्यास भरपूर वाव आहे. प्राणीमित्रांसाठी सुखावणारी बाब ठरली आहे."- डॉ. दिनेश विल्हेनकर (प्रयोगशील पशुवैद्य)