शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मराठवाड्यात 10 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य, छोट्या उद्योगांपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:34 IST

मराठवाड्यात 10 हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे. टाटा, सिमेन्स, स्टरलाईट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आॅरिक सिटीतील कामांची पाहणी करून आढावा घेतल्यामुळे भविष्यात तेथे गुंतवणूक होण्याची शक्यता इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन मराठवाडा या दुस-या औद्योगिक परिषदेमुळे निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला. 

औरंगाबाद, दि. 8 - मराठवाड्यात 10 हजार कोटींची गुंतवणूक येत्या पाच वर्षांत होणार आहे. टाटा, सिमेन्स, स्टरलाईट, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सारख्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आॅरिक सिटीतील कामांची पाहणी करून आढावा घेतल्यामुळे भविष्यात तेथे गुंतवणूक होण्याची शक्यता इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन मराठवाडा या दुस-या औद्योगिक परिषदेमुळे निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी पत्रकार परिषदेत केला. 

या परिषदेत कॅनडा, फ्रान्स व इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सीआयआय, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर, मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात शुक्रवारी परिषद घेण्यात आली. यावेळी कॅनडाचे व्यापार आयुक्त जोनाथन कुपी, सीआयआयचे राज्यअध्यक्ष ऋषि बागला, मराठवाडा अध्यक्ष एन. श्रीराम, रसना समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पीरुझ खंबाटा, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकिळ, उद्योजक राम भोगले, के. श्रीनिवासन, अविक रॉय, देसाई, राजेंद्र देवतळे, डीएमआयसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार,भास्कर मंडल, सुनील खन्ना, राजीव विजय, निनाद करपे आदींची उपस्थिती होती. 

परिषदेसाठी आलेल्या उद्योजकांनी गुरुवारी सायंकाळी आॅरिक सिटीतील सुविधांची पाहणी केली. आॅरिक काही उद्योजकांच्या मनात भरले आहे. नवीन गुंतवणूक व विस्तारीकरणासाठी आॅरिकमध्ये भविष्य आहे, असे सीआयआयचे अध्यक्ष बागला यांनी सांगितले. गेल्या वर्षी घेतलेल्या पहिल्या परिषदेतून १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य होते. २५०० कोटींची गुंतवणूक झाली. ५२ ऐवजी ८ हजार रोजगारनिर्मिती झाली. २८ हजार अप्रत्यक्ष रोजगाराचे लक्ष्य होते, असेही यावेळी सांगण्यात आले. परिषदेच्या दिवसभराच्या सत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मुंबई, पुणे, नाशिकपेक्षा मराठवाडा उद्योगांसाठी मोठा पर्याय आहे. दळणवळणाच्या भविष्यात होणा-या सुविधांबाबत सर्वंकष चर्चा परिषदेत झाली. 

स्टरलाइटची ३ हजार कोटींची गुंतवणूक 

सरकारच्या नॅशनल आॅप्टिक फायबर (एनओएफएन) प्रकल्पातील प्रमुख पुरवठादार स्टरलाईट टेक्नॉलॉजीस ही कंपनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तीन टप्प्यांमध्ये पाच वर्षात ही गुंतवणूक औरंगाबादेत करण्यात येणार असल्याची घोषणा स्टरलाईटचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. राव यांनी केली. 

२०२० पर्यंत २० हजार कोटींचा महसूल 

राज्य व केंद्र सरकारला विविधकरांच्या रुपाने औरंगाबादेतून मिळणा-या महसुलात सातत्याने वाढ होत आहे. २०१४-१५ या वर्षी उद्योगांनी १३ हजार १५९ कोटी रुपयांच्या कराचा भरणा केला. २०१५-१६ वर्षी १२,९००कोटी, तर २०१६-१७ या वर्षी १३,११३ कोटीचा महसूल दिला. २०२०पर्यंत औरंगाबादेतून केंद्र आणि राज्याला २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल, असा विश्वास उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

अपेक्षित गुंतवणूक अशी 

स्टरलाईट टेक कंपनी ३ हजार कोटी, ओएमआर बागला आॅटोमोटिव्ह कंपनी ४०० कोटी, एलजी सेंकड फेज गुंतवणूक १ ते २ हजार कोटी आणि काही छोटया-मोठ्या कंपन्या मिळून ५ हजार कोटींची गुंतवणुकी करतील. एकूण गुंतवणूक सुमारे १० हजार कोटींची असेल. असे सीआयआयचे अध्यक्ष ऋषि बागला यांनी नमूद केले. ते म्हणाले आॅरिक, शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी प्रोजेक्ट मध्ये पायाभूत सुविधा कंपन्यांना दिसू लागल्या आहेत. कंपन्यांनी त्याची चाचपणी केली आहे. ४-ते ५ वर्षांत गुंतवणूक वाढणार आहे. गुंतवणुकीनंतर सुमारे २ लाख ५० हजाराहून अधिक हातांना रोजगार उपलब्ध होईल. असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.