शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तन्मय भटला गौरव गेराचं त्याच्याच भाषेत चोख उत्तर

By admin | Updated: June 3, 2016 13:35 IST

लता मंगेशकरांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपलं मत नोंदवल असताना अभिनेता गौरव गेरानेही तन्मय भटवर टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात सर्व स्तरातून टीका होत आहे. स्वत: लता मंगेशकर यांनी कोण तन्मय भट ? मी त्याला ओळखत नाही असं म्हणत त्याची जागा दाखवून दिली होती. लता मंगेशकरांच्या समर्थनार्थ अनेकांनी आपलं मत नोंदवल असताना अभिनेता गौरव गेरानेही तन्मय भटवर टीका केली आहे. 
 
गौरव गेरानं अनोख्या पद्धतीने लता मंगेशकर यांची बाजू घेत तन्मय भटला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. तन्मय भटप्रमाणे गौरव गेराने व्हिडिओ अपलोड केला आहे. 'माझ्या आई-वडिलांनी हा व्हिडिओ अपलोड करु नको असा सल्ला दिला होता, पण मला घाबरत जगायचं नाही आहे. आणि हो मी लतादीदींचा खुप मोठा फॅन आहे', असंही गौरव गेराने लिहिलं आहे. 
 
 
एआयबी कॉमेडी मास्टर तन्मय भट्टनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा अपमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ स्नॅपचॅट आणि फेसबुकवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर टीका केली होती. या वादग्रस्त व्हिडीओमध्ये सचिन आणि लता मंगेशकर यांच्या शाब्दिक चकमक झडल्याचं दाखवण्यात आलं होतं, त्यात अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता. या व्हिडीओवरून तन्मय भट्ट याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. अनेक बॉलिवूडकरांनी हा व्हिडीओ विनोदी नसून, वादग्रस्त असल्याचं म्हटलं होतं.
 
 
या आधीही एआयबीनं अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोअर यांच्याबाबत शिवीगाळ केल्याचं दाखवलं होतं. त्याप्रकरणी एआयबीविरोधात एफआयआर दाखल झाला होता. या व्हिडीओमध्ये तन्मयनं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांना 'जॉन स्नोही मेला मग तुम्ही कधी मरणार आहात. तुमचा चेहरा आठ दिवस पाण्यात ठेवल्यासारखा दिसतो आहे', असे प्रश्न विचारून अत्यंत हीन भाषेत टीका केली होती. व्हिडीओवर अनुपम खेर, रितेश देशमुख, सेलिना जेटली आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनीही सडकून टीका केली होती.