शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सर्वात उंच 'भांबवली धबधबा' आता अधिक जवळून !

By admin | Updated: July 22, 2016 16:20 IST

देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'भांबवली'चे दृश्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली आहेत. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 22 -  देशातील सर्वात उंच धबधबा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'भांबवली'चे दृश्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळली आहेत. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी गावाजवळ वाहने लावून कैक किलोमीटर चालत जावे लागायचे. पर्यटकांची ही कुचंबणा ओळखून भांबवलीच्या ग्रामस्थांनी धबधब्याजवळच 'व्ह्यू पॉइंट' तयार करण्यास परवानगी दिली असून यासाठी लागणाऱ्या रस्त्याच्या जागेलाही ह्यना हरकतह्ण प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लिहून दिले आहे. आजपर्यंत कर्नाटकातील 'जोग फॉल्स' हाच सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जायचा. 'जोग फॉल्स'ची उंची २५२ मीटर आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील भांबवलीच्या वजराई धबधब्याची उंची ५६० मीटर असल्यामुळे हाच देशातील सर्वात उंच धबधबा असल्याची पोस्ट काही पर्यटकांनी सोशल मीडियावर टाकली. गेल्या काही महिन्यांपासून भांबवली धबधब्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आपसूकच हजारो पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी कास पठाराकडे वळताहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मनाजोगा पाऊस झाल्यामुळे कास पठार परिसरातील बहुतांश धबधबे कोसळू लागले असून शेकडो झ-यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा फुलून निघाल्या आहेत. या सर्वांचा राजा म्हणून ओळखला जाणारा भांबवलीचा वजराई धबधबाही ओसंडून वाहू लागला आहे. मात्र, हा धबधबा पाहण्यासाठी कास गावाच्या पुढे डावीकडे वळाल्यानंतर आतमध्ये असणाऱ्या भांबवलीत वाहने ठेवून चालत जंगलात जावे लागते. तेथे निसरड्या दगडांवर उभारुन धबधब्यासोबत फोटो काढण्याची कसरतही पर्यटकांना करावी लागते.