शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

तळीरामांचे नववर्ष कोठडीत

By admin | Updated: January 2, 2015 00:56 IST

थर्टी फर्स्टच्या रात्री ‘बेधुंद’ होऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ३५८ तळीरामांचे नववर्ष पोलीस कोठडीत साजरे झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १०० ने वाढला आहे.

पुणे : थर्टी फर्स्टच्या रात्री ‘बेधुंद’ होऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ३५८ तळीरामांचे नववर्ष पोलीस कोठडीत साजरे झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १०० ने वाढला आहे. बुधवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ५ हजार २०० चालकांसह एकूण ८ हजार ७७२ वाहनचालकांवर वेगवेगळ्या कारवाई करुन ९ लाख १५ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.गेल्या वर्षी २५३ तर २०१३ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री १४७ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली होती. दरवर्षी हा आकडा वाढत चालला आहे. यंदा प्रथमच हॉटेल्स, क्लब यांना पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे तुलनेत रस्त्यांवरची गर्दी कमी होती. परंतु हॉटेल्समधून बाहेर पडल्यानंतर सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे वचक बसला. ८८ ब्रेथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून मद्यपी वाहनचालकांना अटक करण्यात आली. गुरुवारी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. यासोबतच झेब्रा क्रॉसिंगच्या ५५२, काळ्या काचांच्या ५६६, लेन कटिंगच्या १५० तर ट्रिपल सीटच्या ४५ कारवाई केल्या. (प्रतिनिधी)असेही ‘लक्षवेधी’ नग!बेधुंद तळीरामांना पकडून वाहतूक पोलीस कार्यालयात नेण्यात येत होते. अशाच एका रिक्षाचालक तळीरामास वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याला घेऊन शिवाजीनगर वाहतूक पोलीस कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. वाहतूक पोलिसांचा ताफा पाहून त्याला अक्षरश: रडू कोसळले. मग काय मोबाईलमधील त्याच्या बायकोच्या फोटोकडे पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आजूबाजूचे त्याच्याकडे अभावितपणे तर कुणी केविलवाण्या नजरेने पाहत होतो. वाहतूक पोलिसांमध्ये मात्र हा नजारा पाहून हास्याचे फवारे फुटत होते. काही पोलिसांना त्याची दयाही येत होती. बायकोच्या फोटोकडे पाहत, मी पुन्हा दारू पिणार नाही, असे म्हणणारा तो मात्र सर्वांमध्ये लक्षवेधी ठरला.