शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

टकल्या, हेकन्या...! एसटी संपाच्या बैठकीत सदावर्ते, कोल्हापूरकराची जुंपली, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 15:26 IST

एसटी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करून संप मिटविला खरा पण त्याची चर्चा होण्याऐवजी टकल्या, हेकन्याचीच चर्चा होऊ लागली आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतच्या सरकारसोबतच्या बैठकीत बुधवारी मोठा राडा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच टकल्या, हेकन्या अशा शब्दांची सरबत्ती पहायला मिळाली. एसटी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करून संप मिटविला खरा पण त्याची चर्चा होण्याऐवजी टकल्या, हेकन्याचीच चर्चा होऊ लागली आहे. 

कोल्हापूरचे श्रीरंग बरगे यांनी बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांना गुणरत्न सदावर्तेंबरोबर झालेल्या शाब्दीक चकमकीचा किस्सा सांगितला. तसेच सदावर्तेनी घुशीसारखी कृती समितीमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला. सदावर्तेंचा कृती समितीशी काही संबंध नसल्याचेही ते म्हणाले. 

बैठकीत नेमके काय घडले? मूळ विषय वेतनवाढीचा बाजुला सारून सदावर्ते मध्येच भाषण करू लागले. मला ते नको होते. म्हणून मी हसलो. तर सदावर्तेंनी मला विचारले तेव्हा मी त्यांना मूळ विषय बोला असे सांगत भाषणापासून रोखले. यावेळी त्यांनी मला टकल्या म्हटले मग मी पण त्यांना हेकन्या म्हणालो. यावर सदावर्ते माझ्याकडे पुढे येत होते, मी त्यांच्या अंगावर धावून गेलो. मी कोल्हापूरच्या तालमीतला आहे त्याला घाबरणार नाही, असे बरगे यांनी सांगितले. यावेळी बरगे आणि सदावर्तेंना फडणवीस, शिंदेंनी आवरल्याचे कळते. 

बरगे हे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटनिस आहेत. सदावर्तेने एसटी आंदोलनातही प्रसिद्धीसाठी घुसखोरी केली, मी त्याला बाप भेटलो, कोल्हापुरी पाणी काय असते ते त्यांना दाखवून दिले, असे बरगे म्हणाले. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेST Strikeएसटी संपEknath Shindeएकनाथ शिंदे