शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 06:19 IST

केंद्र सरकारकडे मागणी; तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर कर्ज काढावे, सरकारी बॉन्डच्या माध्यमातून लोकांना पैसे द्यावेत, या आणीबाणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला २१ लाख कोटींची गरज लागेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतला सांगितले.अमेरिकेची अर्थव्यवस्था २१ तर चीनची १४ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. भारताची २.८ ट्रिलीयन डॉलर्सची आहे. अमेरिकेने या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या १० टक्के म्हणजे जवळपास २.२ ट्रिलीयन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. इंग्लंडने १६ टक्के, जर्मनीने २२ टक्के पॅकेज जाहीर केले आहे. आपणही अर्थव्यवस्थेच्या प्रमाणात १० टक्के पॅकेज जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी फक्त १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. ते अत्यंत कमी आहे. आज कर्ज काढले म्हणून कोण काय म्हणेल याचा विचार करण्याची वेळ नाही. मजुरापासून ते पगारी नोकरदारापर्यंत सगळ्यांना पैसा द्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांकडे पैसाच नसेल तर सगळा बाजार ठप्प होईल. त्यासाठी ग्रामीण भागात क्रयशक्ती वाढवावी लागेल. बाजाराची परिस्थिती जर खराब असेल तर काहीही विकत घेण्याची मानसिकताच उरणार नाही. राष्टÑीयीकृत, खासगी व सहकारी बँकांचे तीन महिने हप्ते नाही भरले तरी चालतील, असे केंद्राने जाहीर केले आहे पण पैसाच नसेल तर लोक हप्ते व व्याज भरतील कसे? त्यामुळे या तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे, , असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था आणि विविध कार्यकारी सेवा सोसायट्या यांचेही तीन महिन्यांचे व्याज माफ करुन त्यांना देखील ही सवलत द्यावी. खासगी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकल स्टाफ यांचाही सरकारने विमा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण