शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एसआयटी वाघमारेचा घेणार ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 09:27 IST

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

कोल्हापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र ‘एसआयटी’चे पथक घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तुलातून केल्याची माहिती कर्नाटक एसआयटीने शुक्रवारी दिली आहे.गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरू येथे गोळ्या घालून हत्या झाली. ही हत्या आपणच केल्याची कबुली वाघमारे याने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. लंकेश यांच्यासह कलबुर्गी आणि पानसरे या तिघांच्या हत्येसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय होता. जप्त केलेल्या गोळ्या आणि रिकाम्या पुंगळ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासल्यानंतर आलेल्या अहवालातून तसा दुजोराही मिळाला होता. त्यानुसार वाघमारे याला पानसरे हत्येच्या तपासासाठी महाराष्टÑ एसआयटीचे पथक ताब्यात घेणार आहे. पानसरे कुटुंबीयांनीही वाघमारे याच्याकडे चौकशी करण्याची मागणी तपास यंत्रणेकडे केली आहे.कर्नाटक एसआयटीने लंकेश हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपी महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्येप्रकरणी पहिल्यांदाच कर्नाटक तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. कोल्हापूर पोलीस व महाराष्टÑ एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात असून, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संशयित वाघमारे याचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.>कर्नाटक ‘एसआयटी’च्या संपर्कात आम्ही पहिल्यापासून आहोत. आमचे पथक बंगलोरला जाणार आहे. परशुराम वाघमारेचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचा एक जरी पुरावा मिळाला तरी आम्ही त्याचा ताबा घेणार आहोत.- संजयकुमार, एसआयटी प्रमुख, पुणे

टॅग्स :Crimeगुन्हा