शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रांतीचा सण साजरा करताना आरोग्याची काळजी घ्या: छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 14:26 IST

पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन 

मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.  

मकर संक्रांतीच्या राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की मकर संक्रांतीचा सण म्हंटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग उडवत असतात मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशुपक्ष्यांना तसेच मानवी जीविताला देखील धोका असल्याने  नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले. 

संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो मात्र देशभरात कोरोना संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हाथ स्वछ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ