शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दीक्षितांवर कारवाई करा

By admin | Updated: December 29, 2014 05:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना संतापली असून, दीक्षित यांनी पुरावे द्यावे

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना संतापली असून, दीक्षित यांनी पुरावे द्यावे अन्यथा सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असून, हा भ्रष्टाचार थांबला तर या शहरातील फ्लॅटचे दर प्र्रति चौरस फूट किमान ५०० रुपयांनी कमी होतील, असा गौप्यस्फोट दीक्षित यांनी पंढरपूर येथे बोलताना केला होता. शिवसेनेचे खासदार व दीर्घकाळ मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहिलेल्या राहुल शेवाळे यांनी या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. दीक्षित यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असून, त्यांच्याकडे पुरावे असल्यास शिवसेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. मात्र तसे पुरावे दीक्षित देणार नसतील तर त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे घरे महाग होत असतील तर ही गंभीर बाब असून, मुख्यमंत्र्यांनी दीक्षित यांच्या वक्तव्याची दखल घेत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दीक्षित यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (विशेष प्रतिनिधी)