शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

अनधिकृत धार्मिक स्थळांवर तीन महिन्यांत कारवाई करा

By admin | Updated: September 22, 2016 05:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून, उभारलेल्या एक हजार ४३४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर डिसेंबरपर्यंत कारवाई करा

मुंबई : राज्यातील महापालिकेच्या हद्दीत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींवर अतिक्रमण करून, उभारलेल्या एक हजार ४३४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर डिसेंबरपर्यंत कारवाई करा, असा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकांना दिला. ही सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे २९ सप्टेंबर २००९ नंतर बांधण्यात आली आहेत. २९ सप्टेंबर २००९ नंतर राज्यातील महापालिकांच्या हद्दीत ८७१, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर ८४७ अनधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आली. त्यापैकी महापालिकांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या नऊ महिन्यांच्या मुदतीत २२५, तर सरकारने १५९ धार्मिक स्थळांवर कारवाई केली. राज्यात दुष्काळ पडल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना वेगवेगळी कामे देण्यात आली होती. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही, असे स्पष्टीकरण सरकारने न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाला दिले. सप्टेंबर २००९ नंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाने दिलेली नऊ महिन्यांची मुदत १७ आॅगस्ट रोजी संपल्याने, सरकारने ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारची विनंती मान्य करत, सप्टेंबर २००९ नंतरची महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरील एकूण १,४३४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. (प्रतिनिधी)