शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

म्हसळा येथे तहसीलदारांना रेतीमाफियांची मारहाण

By admin | Updated: April 6, 2015 03:26 IST

विनापरवाना रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंबेत येथे गेलेल्या म्हसळा तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी वीरसिंग वसावे,

म्हसळा : विनापरवाना रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंबेत येथे गेलेल्या म्हसळा तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी वीरसिंग वसावे, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, तलाठी सदानंद वारगडे, कल्याण देऊळगावकर, दत्तू कर्चे यांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. म्हसळा तहसीलदार वीरसिंग वसावे हे श्रीवर्धन प्रांताधिकारी तेजस समेळ यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यासाठी पथकासह आंबेत बस स्थानकाजवळ गेले होते. म्हाप्रळ बाजूकडून रेतीने भरलेले तीन ट्रक जाताना दिसले असता त्यांनी पाठलाग केला. ट्रक थांबवण्याचा प्रयत्नही केला, मात्र ट्रक निघून गेले. पळून जाणाऱ्या ट्रकला खाजगी वाहनाने पाठलाग करून वाहन आडवे घालून अडवले असता पाठीमागून येणारे दुसरे दोन ट्रक येऊन थांबले. तीन ट्रकची पाहणी केली असता प्रत्येक वाहनामध्ये पाच ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. रेती वाहतूक परवाना नसल्याने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात अली, मात्र तेव्हाच आंबेत बाजूकडून वाहनांनमधून काही लोक आले व त्यांनी तहसीलदार व त्यांच्या सोबत असलेले नायब तहसीलदार, कर्मचारी यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केली. लाकडी दांडक्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन रेतीने भरलेले तीनही ट्रक पळवून नेले. घटनेची तक्रार म्हसळा तहसीलदारवीरसिंग वसावे यांनी दिल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात फैयाज पेवेकर, ट्रक चालकांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)