पुणे : शहरात मंगळवारी एकाचा स्वाइन फ्लू या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराच्या पुण्यातील बळींची संख्या १०१ वर पोहोचली आहे. यातील ३७ रुग्ण पुण्याच्या हद्दीतील असून, ६४ रुग्ण हे हद्दीबाहेरील आहेत.शहरातील ढगाळ हवामान आणि संसर्गजन्य आजारांसाठी पोषक असणारे वातावरण तसेच नागरिकांमध्ये या आजाराबाबत नसलेली जागृती आणि अस्वच्छता ही शहरातील आजार वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. मंगळवारी दिवसभरात स्वाइन फ्लूच्या आजारासाठी १,००० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील १२८ जणांना टॅमी फ्लू हे स्वाइन फ्लूवरील औषध देण्यात आले आहे. यातील २८ जणांच्या कफाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता ८ जणांना स्वाइन फ्लू असल्याचे निश्चित झाले. जानेवारी २०१५ पासून शहरातील स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या आज ९१५वर पोहोचली असून, मंगळवारी स्वाइन फ्लूच्या १६ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
पुण्यात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच
By admin | Updated: September 2, 2015 01:07 IST