शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

घुमानला साहित्य महामंडळाची संस्थाच नाही?

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत

महामंडळाचे स्वत:च्याच नियमांकडे दुर्लक्ष : हा तुघलकी कारभार असल्याची चर्चा राजेश पाणूरकर - नागपूर साहित्य महामंडळाचे ८८ वे साहित्य संमेलन पंजाब येथील संत नामदेवांच्या गावी घुमान येथे आयोजित करण्यात आले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि साहित्य विश्वानेही महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहित्याच्या माध्यमातून दोन प्रांताची जवळीक आणि सलोखा वाढत असेल तर ती आनंदाचीच बाब आहे. पण हे संमेलन आयोजित करताना महामंडळाने पुन्हा स्वत:च्याच घटनेकडे आणि नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. विश्व साहित्य संमेलनाच्या संदर्भात महामंडळ अडचणीत आले असताना, पंजाबला साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या उत्साहात महामंडळाने सारीच कामे घटनाबाह्य केल्याने त्याची उलटसुलट चर्चाही रंगली आहे. कुठल्याही संस्थेचा कारभार निश्चित नियमाने चालावा यासाठीच नियम आणि घटना तयार केली जाते. अन्यथा महामंडळाची घटना तयार करण्याचा प्रयत्नच झाला नसता. पण साहित्य क्षेत्रातल्या बुद्धिवंतांनी मात्र बेदरकारपणेच वागायचे असे ठरविले असावे. विश्व साहित्य संमेलनाबाबतचे सारेच वाद सुरूच आहेत. त्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीतही यंदा महामंडळाने स्वत:कडे वाद ओढवून घेतला आहे. महामंडळाच्या घटनेप्रमाणे स्थळ निवड समिती महत्त्वाची आहे. यात महामंडळाचे चार प्रतिनिधी, प्रत्येक घटक संस्थेचा एक पदाधिकारी आणि ज्या समाविष्ट व संलग्न संस्थेच्या कार्यक्षेत्रात हे संमेलन होत असेल तर तेथील एक प्रतिनिधी स्थळ निवड समितीत असल्याशिवाय स्थळ निवड समिती पूर्णच होत नाही. घुमानला महामंडळाची समाविष्ट किंवा संलग्न संस्थाच नाही. कौतिकराव ठाले पाटील यांनीही पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्या वेळी अ.भा. मराठी साहित्य संमेलनच विदेशात करण्याचा घाट घातला होता. महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर राहील, या घटनेच्या आधारावर अ.भा. संमेलनही विदेशात होऊ शकते, असा तर्क त्यावेळी लढविण्यात आला होता. पण महामंडळाची कुठलेही घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्था विदेशात नसल्यामुळेच विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण घटनात्मक तरतुदी न करता विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याने हे संमेलनच अडचणीत आले. हा मुद्दा अद्यापही निकालात निघाला नाही. आता घुमानला साहित्य संमेलन आयोजित करताना महामंडळ पुन्हा त्याच मुद्यावर आले आहे. घुमानला साहित्य संमेलन होणार, ही समस्त मराठी रसिकांसाठी आनंदाचीच बाब असली तरी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यातच महामंडळ धन्यता मानते आहे आणि पुन्हा स्वत:वर नामुष्की ओढवून घेते आहे. घटनेप्रमाणे महामंडळाचे कार्यक्षेत्र भारत आणि भारताबाहेर आहेच. पण त्यासाठी महामंडळाच्या नियमाप्रमाणे संमेलन घेण्यासाठी घुमानला संलग्न वा समाविष्ट संस्था असणे गरजेचे आहे. नसल्यास तशी संस्था स्थापन करून नंतरच हे संमेलन तेथे घेणे सर्वथा योग्य आहे. पण महामंडळाने तेथे संलग्न वा समाविष्ट संस्थेबाबत पूर्णत: दुर्लक्ष केल्याने हे संमेलन वैध की अवैध, असा मुद्दा विश्व साहित्य संमेलनाप्रमाणेच गाजणार असल्याचे चिन्ह आहे. संलग्न वा समाविष्ट संस्था घुमानला नसल्याने मुळात नियमाप्रमाणे स्थळ निवड समितीच संपूर्ण होत नाही. त्यामुळे स्थळ निवड समितीपासून आयोजनापर्यंत सारेच अवैध कार्य महामंडळासारख्या साहित्य क्षेत्रात शीर्षस्थ संस्थेने करावे, हे कुणाच्याही तर्काला पटणारे नाही. घटना, नियम काही प्रमाणात माणसाच्या सुविधेसाठी वाकविले वा शिथिल केले जाऊ शकतात हे मान्य आहे. पण संपूर्ण घटनाच नाकारणे हा करंटेपणा आहे.पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्यावेळी चार घटक संस्थेपैकी तीन संस्थांच्या वकिलांनीही याच मुद्यावर अ.भा. मराठी साहित्य संमेलन विदेशात घेणे योग्य नाही, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अ.भा.ऐवजी विश्व साहित्य संमेलनाचा पर्याय स्वीकारण्यात आला होता. याच्या सर्व प्रती आणि अहवाल खुद्द महामंडळाकडेच उपलब्ध आहे. पण यातून महामंडळाने धडा घेतल्याचे दिसत नाही.