शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

‘स्वच्छ भारत अभियान’चे पथकच लाचेच्या सापळ्यात

By admin | Updated: January 22, 2017 02:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात पाहणी करण्यासाठी आलेले पथकच लाचेच्या जाळ्यात अडकले. महापालिकेच्या बाजूने

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत औरंगाबाद शहरात पाहणी करण्यासाठी आलेले पथकच लाचेच्या जाळ्यात अडकले. महापालिकेच्या बाजूने सकारात्मक रिपोर्ट देण्यासाठी या पथकाने चक्क महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच एक लाख सत्तर हजार रुपये लाच घेतली. मात्र महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या दक्षतेमुळे हे त्रिसदस्यीय पथक एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लाच घेताना पकडले गेले. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले लाचखोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातीलच आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेल्या पथकातील शैलेश बंजानिया , विजय जोशी आणि गोविंद गिव्हारे (सर्व राहणार सूरत, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. यंदा ‘स्मार्ट सिटी’च्या ‘टॉप टेन’ मध्ये औरंगाबाद शहर यावे म्हणून महापालिकेने तीन महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी तीन सदस्यांचे पथक औरंगाबाद शहरात दाखल झाले. शुक्रवारी सकाळीच त्यांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेतली. त्यांना पाहूृन क्षणभर आयुक्तांना शंका आली होती. मात्र, केंद्रीय पथक म्हणून त्यांनी फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. शुक्रवारी दिवसभर पथकातील ज्येष्ठ सदस्य शैलेश बजोरिया यांनी महापालिकेत बसून ९०० गुणांसाठी कागदपत्रांची पाहणी सुरू केली. त्यांच्या सोबतचे दोन सदस्य विजय जोशी, गोविंद गिव्हारे शहरात वेगवेगळ्या भागांत पाहणी करीत होते. पाहणी दौऱ्यात दोन्ही सदस्य मनपा अधिकाऱ्यांना सिगारेटसह छोट्या-मोठ्या गोष्टींची मागणी करीत होते. हा सर्व प्रकार मनपा अधिकाऱ्यांनाही धक्कादायक होता. सायंकाळी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये आल्यावर सर्व सदस्यांनी आम्हाला दारू पाहिजे अशी मागणी केली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक जयश्री कुलकर्णी, घनकचरा विभागाचे सहायक अधिकारी प्रमोद खोब्रागडे यांनी ही बाब उपायुक्त अय्युब खान यांच्या कानावर घातली. खान यांनी त्वरित बकोरिया यांना सांगितले. आयुक्तांनी इच्छा नसतानाही परवानगी दिली. रात्री उशिरा पथकातील सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांचा छळ सुरू केला. तुमचे शहर खूपच घाण आहे, तुम्हाला चांगला ‘पॉझिटिव्ह रिपोर्ट’ हवा असेल तर आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्हाला अडीच लाख रुपयांची रक्कम द्यावी लागेल, अशी थेट लाच मागितली. आयुक्त बकोरिया यांना हा प्रकार समजताच त्यांनी नगरविकास विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.