शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय

By admin | Updated: April 23, 2017 20:24 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे.

ऑनलाइन लोकमत 
ठाणे, दि. 23 - स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे. आता केंद्रात सरकारही आपलेच आहे. मग सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा  सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. 
 
29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळालच पाहिजे. आपल्या देशात कोणते रत्न जन्माला आले हे जगाला कळावे म्हणून हा पुरस्कार मिळायला हवा. आता केंद्रात सरकार आपलेच असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे.  यावेळी सावरकरप्रेमींना सावरकर किती समजले हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 
 
सावरकर संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमास  राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. त्यांनीही सावरकरांना भारतरत्न देण्याविषयीची आपली भूमिका मांडली. "सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच वीर सावरकर यांचे विचार शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार नक्कीच करेल, असेही ते म्हणाले.