शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणा-या तरुणीचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: June 23, 2017 23:50 IST

विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहणा-या कविता उर्फ पिंकी ठाकूर (वय २१) हिचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 23 - विवाहित तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणा-या कविता उर्फ पिंकी ठाकूर (वय २१) हिचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याची शंका घेऊन कुटुंबीयांनी आरोप केल्यामुळे हे प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाले आहे.
एका शोरूममध्ये काम करणारी कविता आर्यन मिश्रा नामक तरुणासोबत राहत होती. आर्यन विवाहित आहे. कवितासोबत काही दिवसांपासून आर्यनचे मतभेद झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, राहत्या सदनिकेत शुक्रवारी दुपारी कविताचा  गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. प्रारंभी तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नंतर मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कविताला मृत घोषित केले. तिच्या मृत्युचे वृत्त कळताच तिचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी आर्यनवर आरोप लावून कविताच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. त्यामुळे गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी या प्रकरणात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करून डॉक्टरांना तातडीने अहवाल मागितला.
शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, त्यानंतर या प्रकरणात कारवाईचे स्वरूप ठरवू, अशी माहिती निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रक२ण लिव्ह इन रिलेशनशिपचे असल्याने पोलीस गंभीरपणे तपास करीत असल्याचेही निकम म्हणाले.