शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषधाने विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: May 19, 2017 19:18 IST

नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजताच्या सुमारास घडली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 19 - नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११़३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत सासरच्या मंडळींनीच विवाहितेस विषारी औषध पाजल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे़ याप्रकरणी अद्यापही पोलिसांत नोंद नाही.सोनाली उत्तम चव्हाण (२४, रा़ नेहरुनगर तांडा, ता़ रेणापूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे़ अहमदपूर तालुक्यातील सांगवी (शि़) येथील सोनाली मेहरबान राठोड हिचा विवाह नेहरुनगर तांडा (ता़ रेणापूर) येथील उत्तम तुकाराम चव्हाण याच्यासोबत सन २०११ मध्ये झाला होता़ विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी विवाहिता सोनाली हिला ट्रॅक्टर घेण्यासाठी व शेतावरील कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणून तगादा लावण्यात येऊ लागला़ नेहमीच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून तिने पंधरा दिवसांपूर्वी रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी दोघांची समजूत पाठवून दिले होते़दरम्यान, आठ दिवसांपूर्वी सोनाली ही माहेरी आली होती़ तेव्हा पती उत्तम याने तिला सासरी आणले़ गुरुवारी दुपारच्यावेळी तिला सासरच्या मंडळींनी विषारी औषध पाजले़ त्यानंतर ती आरडाओरड करु लागल्याने सायंकाळी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सासरच्या मंडळींनी दाखल केले़ उपचारादरम्यान, तिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यास नकारसोनाली हिच्या मृत्यूशी जबाबदार असणाऱ्या सासरच्या मंडळींविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी माहेरच्या मंडळींनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला़ सायंकाळी ७ वा़ पर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेतला नाही.सासरच्यांनी केला घातमाहेरहून पैसे आण म्हणून सोनालीचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असे़ पंधरा दिवसांपूर्वी तिने रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही़ सासरच्या मंडळींनी तिला विषारी औषध पाजल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सोनालीचे वडिल मेहरबान राठोड व नातेवाईकांनी केला.