शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

किंंजलवर बलात्कार झाल्याचा दाट संशय

By admin | Updated: July 23, 2016 03:07 IST

विरार येथील किंंजल शहा हत्येचे गूढ अद्याप गुलदस्त्यात असून तिच्या प्रियकराने अमानवी बलात्कार केल्याचा संशय आहे.

वसई : विरार येथील किंंजल शहा हत्येचे गूढ अद्याप गुलदस्त्यात असून तिच्या प्रियकराने अमानवी बलात्कार केल्याचा संशय आहे. मात्र, त्याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खुलासा होणार आहे. दुसरीकडे, तिला तुंगारेश्वर येथील डोहात बुडवून मारण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हत्येमागील गुंता वाढत चालल्याने पोलिसांनी गूढ उकलण्यासाठी आरोपीला घेऊन प्रात्यक्षिक करणार आहे. विरारच्या बोळिंज येथे राहणाऱ्या किंंजलचे तिचा प्रियकर देवेंद्र भोसलेने संशयावरून हत्या केली होती. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते. त्यानंतर वडिलांनी त्याला घरात बंद करून पोलिसांना बोलावून देवेंद्रला पोलिसांच्या हवाली केले होते. त्याच्या अटकेनंतर त्याने पोलिसांना एकामागून एक चक्रावून टाकणारी माहिती दिली आहे. त्यामुळे किंंजलची हत्या अमानुषपणे केल्याचे उजेडात येत आहे. मात्र, यात देवेंद्रला कुणीतरी मदत केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तसेच देवेंद्रने तिच्यावर बलात्कार तसेच अनैर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र, हा प्रकार किंंजलच्या मृत्यू आधी की नंतर झाला याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, देवेंद्रने अमानवी कृत्य केल्याने मानसिक आणि शारिरीक आघात झाल्याने किंंजलचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी देवेंद्र भोसले याने सोमवारी सुरुवातीला किंंजलला तुंगारेश्वर जंगलात नेले होते. त्याठिकाणी तिला डोहात बुडून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी केली असता किंजल बेशुद्ध पडल्याचे निमित्त काढून देवेंद्रने तिला बेशुद्धावस्थेत रिक्षातून विरारला आणले होते. त्यानंतर बोळिंज येथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केली. हा सर्व घटनाक्रम उलगडण्यासाठी अर्नाळा पोलीस सर्व घटनास्थळाचा क्राईम सिन करत आहेत. यामुळे आम्हाला नेमका गुन्हा कसा घडला किती वेळ लागला ते शोधायला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)तो रिक्षावाला या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदारकिंंजल बेशुद्धावस्थेत असताना आरोपी देवेंद्रने तिला रिक्षात बसवून तुंगारेश्वर येथून विरारच्या बोळिंज येथे आणले. तो रिक्षावाला या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार ठरणार आहे. रिक्षात नेमके काय घडले हेसुद्धा स्पष्ट होणार आहे. किंंजलचा मृत्यू रिक्षात झाला की बोळिंजच्या घटनास्थळात ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. बोळिंजच्या लोकप्रभात कॉम्प्लेक्सच्या मागील निर्जन जागेत त्याने तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. किंंजलवर नेमका लैंगिक अत्याचार ती बेशुद्ध असताना झाला की, मृत झाल्यावर याबाबत तपास सुरू असल्याचे पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी सांगितले. पोलीस या घटनेचे विविध पैलू तपासून पाहत आहेत. त्या दिवशी देवेंद्रसोबत अन्य कुणी होते का, त्याचाही पोलीस तपास करत आहेत. किंंजल आणि देवेंद्रचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु किंंजलचे अन्य तरुणासोबत संबंध असल्याचा देवेंद्रला संशय होता. त्यामुळे चिडलेल्या देवेंद्रने किंंजलचा खून केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.