शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एका 'सिगार'ने 'चिंगारी'चे काम केल्याचा संशय

By admin | Updated: June 3, 2016 19:54 IST

पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून

- राजेश भोजेकर,

वर्धा, दि. 3 -  पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील आग व नंतर बॉम्बस्फोटाला ‘सिगार’ कारणीभूत असल्याचा संशय काही सूत्राकडून वर्तविला जात आहे. या स्फोटाची ‘कोर्ट आॅफ इक्वॉयरी’ सुरू असून देशभरातील तपास यंत्रणाही कामाला लागलेल्या आहेत. या यंत्रणेने या दिशेने तपास केल्यास या बाबीचा उगलडा होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात सोमवारी मध्यरात्री शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट होण्यापूर्वी आग लागली असे प्राथमिक कारण आतापर्यंत पुढे करण्यात आले आहे. मग ही आग कशामुळे लागली, याचे कारण शोधणेही तेवढेच गरजेचे आहे. आग रात्रीला ११ अचानक आग लागल्याचे माहिती झाले आणि लष्करी यंत्रणा कामाला लागली. वास्तविक, आगीचे हे रुप धारण करण्यापूर्वी ती काही तासांपूर्वीपासून धुमसत असावी, असाही संशय व्यक्त केल्या जात आहे. मग आगीची नेमकी सुरूवात कुठून आणि केव्हा झाली, ही बाबही तेवढीच महत्त्वाची ठरणारी आहे.

या दारूगोळा भांडारातील बहुतांश अधिकारी आणि जवानांना सिगारेट ओढण्याचा शोक असल्याची विश्वसनीय माहिती आहे. येथील सुरक्षा यंत्रणा नेहमी सजग असते. त्यामुळे आत प्रवेश करताना सर्व बाबींची तपासणी झाल्याची खात्री पटल्यानंतरच प्रवेश दिला जातो. असे असतानाही येथील अधिकारी वर्ग सिगारेट घेऊन बिनदिक्कतपणे भांडारात प्रवेश करीत असल्याची धक्कादायक माहिती सूत्राने दिली.
 
प्रवेशद्वारावर या अधिकाºयांना हटकणे म्हणजे साहेबांना ज्ञान सांगण्यासारखे आहे. वास्तविक, भांडारात अधिकाºयांना किती दारूगोळा गेला आणि किती आला, याचाच हिशेब ठेवावा लागतो. यापेक्षा दुसरे मोठे जबाबदारीचे काम नसल्यामुळे येथला अधिकारी वर्ग सिगारेट ओढत असल्याची माहितीही सूत्राने दिली. याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे बॉम्बस्फोटापूर्वी लागलेल्या आगीसाठी ‘चिंगारी’चे काम सिगारेटने केले असण्याची दाट शक्यताही सूत्रांकडून वर्तविली जात असली तरी तपासात काय  निष्पन्न होते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
 
सुकलेले गवत आणि सिगार
दारूगोळा भांडाराला आग लागल्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. या आगीच्या घटना होऊ नये, याची खबरदारी म्हणून भांडाराच्या संरक्षण भिंतीच्या आतील सुकलेले गवत काढण्याचा कंत्राट दिला जातो, अशी माहिती आहे. यावर्षी हे गवत कापण्यात आले नसल्याची माहितीही सूत्राने दिली. सिंगारची चिंगारी आणि सुकलेले गवत या आगीला कारणीभूत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.