शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

परिचारकांचे निलंबन : आधी अभय, आता बडतर्फीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:46 IST

विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यास विरोध करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे आणि कपिल पाटील हे सर्व जण उच्चाधिकार समितीचे सदस्य होते. तेथे एकाही बैठकीत त्यांनी परिचारकांचे निलंबन मागे घेण्यास विरोध दर्शविला नसल्याची माहिती समोर आली आहे.

- यदु जोशीमुंबई  - विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यास विरोध करणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे आणि कपिल पाटील हे सर्व जण उच्चाधिकार समितीचे सदस्य होते. तेथे एकाही बैठकीत त्यांनी परिचारकांचे निलंबन मागे घेण्यास विरोध दर्शविला नसल्याची माहिती समोर आली आहे.आमदार परिचारक यांच्या निलंबनासंबंधी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीत सभागृहाचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शरद रणपिसे, नीलम गो-हे, कपिल पाटील, भाजपाचे भाई गिरकर आणि शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश होता. राणे यांनी पुढे आमदारकीचा राजीनामा दिला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी परिचारकांचे निलंबन मागे घेण्यास समितीच्या बैठकीत विरोध केल्याची अधिकृत नोंद वा मतभेदाचे/असहमतीचे पत्रही (डिसेंट नोट) त्यांनी दिलेले नाही. गेल्या आठवड्यात निलंबन मागे घेण्यात आले; तेव्हा सभागृहात अन्य मुद्द्यावर गदारोळ सुरू होता. त्याच गदारोळात परिचारकांचे निलंबन मागे घेण्यात आले. निलंबन मागे घेण्याची घोषणा झाली तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य आणि कपिल पाटील सभागृहात हजर होते. त्या वेळी ते का बोलले नाहीत, असा सवाल भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. माहिती अशी आहे की, विधान परिषदेत निलंबन मागे घेण्याचा ठराव मंजूर होताना तुम्ही काय करत होता? कोणत्याही परिस्थितीत परिचारकांचे निलंबन कायम राहिलेच पाहिजे, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर शिवसेना दुस-या दिवशीपासून आक्रमक झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीने तर तिसºया दिवशी शिवसेनेच्या सुरात सूर मिसळले.पुन्हा निलंबन कशाच्या आधारे करायचे हा प्रश्नप्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली असली तरी तसे करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. परिचारक यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यासाठी त्यांना एकदा निलंबित करण्यात आले. त्यांचे निलंबन गेल्या आठवड्यात विधान परिषदेने मागे घेतले. त्यामुळे त्यांचे निलंबन कायम ठेवण्याची मागणी नियमांच्या चौकटीत मान्य करता येत नाही. आता परिचारक यांना विधान परिषदेत ठरावाद्वारे पुन्हा निलंबित करावे लागणार आहे. मात्र आता त्यांना पुन्हा कशाच्या आधारे निलंबित करायचे हा प्रश्न आहे. कारण आक्षेपार्ह विधानासाठी त्यांना एकदा निलंबित करण्यात आले आहे आणि त्याच विधानासाठी त्यांना दुस-यांदा निलंबित करता येणार नाही. त्यांना पुन्हा निलंबित करायचे तर त्यांनी त्या आक्षेपार्ह विधानानंतर दुस-यांदा असे कोणतेही विधान केलेले नाही किंवा अशी कृतीदेखील केलेली नाही की जिच्यामुळे त्यांना निलंबित करता येईल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. परिचारक यांचे निलंबन वा बडतर्फीचाही निर्णय घ्यायचा असेल तर तसा प्रस्ताव विधान परिषदेत आणून तो मंजूर व्हावा लागणार आहे.निलंबन मागे घेण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीमध्ये माझ्यासमोर झाला नाही. समितीच्या २८ नोव्हेंबरच्या ज्या बैठकीत निलंबन मागे घेण्याचे ठरले असे सांगतात, त्या बैठकीत उपस्थित असल्याची सही मी केली आहे; पण माझ्यासमोर तसा विषय आला नाही. तो निर्णय मला सभागृहात ठरावाच्या वेळीच कळला. परिचारक यांचे निलबंन मागे घेण्यास माझा विरोध आहेच.- डॉ. नीलम गो-हे,विधान परिषद सदस्यअमी उच्चाधिकार समितीचा सदस्य होतो, पण समितीने ज्या बैठकीत परिचारकांची शिक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला त्या बैठकीला मी गैरहजर होतो. परिचारकांना जास्तीत जास्त शिक्षा करावी, अशी भावना मी विधान परिषद सभापतींकडे आधीच व्यक्त केली होती. शिक्षा कमी करण्यास विरोध करणारे मतभेदाचे टिपण (डिसेंट नोट) मी दिलेले नव्हते, कारण तशी पद्धत नसते.- आ. कपिल पाटील,विधान परिषद सदस्य

टॅग्स :Prashant Paricharakप्रशांत परिचारकMaharashtraमहाराष्ट्र