शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

‘उमवि’च्या कुलगुरुपदाचा ‘सस्पेन्स’

By admin | Updated: October 25, 2016 03:59 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती

- राहुल रनाळकर,  मुंबईउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवडीचा ‘सस्पेन्स’ सध्या खान्देशातील शैक्षणिक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. २० आॅक्टोबर रोजी दुपारी अंतिम मुलाखती पार पडून देखील राजभवनातून सोमवारी, २४ आॅक्टोबर रोजी देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. राजभवनाच्या प्रोटोकॉलनुसार अंतिम पाच जणांच्या मुलाखती पार पडल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आत कुलगुरुंची निवड अधिकृतरित्या घोषित केली जाते. तथापि, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सध्या कमालीची लांबली आहे, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु निवड प्रक्रियेचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप आणि संघ परिवाराशी संबंधित सर्वच संघटनांनी प्रतिष्ठेचा केला आहे. संघ जरी प्रत्यक्ष कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामील होत नसला, तरी देखील चांगल्या लोकांची पारख करुन नाव सुचवण्यासाठी संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येते. एका शिस्तबद्ध आणि सचोटी असलेल्या व्यक्तीच्या नावावर एकमत होऊन ते नाव पुढे नेण्यात आले. तर विरोधी गटातील अर्थात माजी कुलगुरुंनीही त्यांच्या माणसांसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत चांगलीच मोर्चेबांधणी केली. अखेर २० आॅक्टोबरला बहुप्रतिक्षित अंतिम मुलाखती पार पडल्या. संकेतानुसार अंतिम मुलाखती ही केवळ औपचारिकता असते. मुलाखतीनंतर केवळ घोषणा हीच महत्त्वाची बाब मानली जाते. सोमवारी दुपारी घोषणा होणारच असा कयास लावण्यात येत होता. तथापि संध्याकाळ होऊनही घोषणा न झाल्याने मोठा हिरमोड झाला.डॉ. पाटील नवे कुलगुरु? गुरुवार, २० आॅक्टोबरपासून कुलगुरुपदाची माळ कोणाच्या गळ््यात पडणार याच्या तर्क वितर्कांना चांगलेच उधाण आले. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर डॉ. पी. पी. पाटील यांचे पारडे सगळ््यात जड आहे. तर त्यांना डॉ. ए. एम. महाजन यांचे आव्हान आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार डॉ. पी. पी. पाटील यांची निवड राजभवनाने केलेली आहे. तथापि, काही ‘अनाकलनीय कारणे’ पुढे करुन ही घोषणा अद्याप झालेली नाही.