शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

स्टेट बँक दरोड्याचा सूत्रधार निलंबित पोलीस!

By admin | Updated: December 28, 2014 23:47 IST

जालना येथे चित्रपटगृहात बसून शिजला कट

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : स्टेट बँकेच्या साखरखेर्डा येथील शाखेची ३0 लाखांची रोकड लुटण्याच्या घटनेमागे एक निलंबित पोलीस शिपाई असल्याचे उघड झाले आहे. हा दरोड्याचा कट जालना येथील एका चित्रपटगृहात बसून रचल्याची माहिती या प्रकरणी अटक केलेल्यांनी पोलिसांना दिली. साखरखेर्डा स्टेट बँकेची कॅश व्हॅन (स्वीफ्ट गाडी) चिखली येथून साखरखेर्डा, देऊळगाव मही, अमडापूर या पाच शाखांमध्ये पैसे ने-आण करण्याचे काम करीत होती. जालना जिल्ह्यातील डुकरे पिंपरी येथील आकाश पांडूरंग थेटे याने त्याचा चुलतभाऊ सुदर्शन हरिभाऊ थेटे याला चिखली ते साखरखचेर्डा मार्गावर धावणार्‍या बँकेच्या या गाडीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.२६ डिसेंबरला शाखेचे कॅशियर विजयसिंह शिखरवार आणि शिपाई नंदू जाधव ३0 लाख रुपयांची रोकड घेऊन सुरक्षारक्षक प्रल्हाद शिंदे आणि वाहनचालक मधुकर लोखंडे यांच्यासह दुपारी २ वाजता बँकेतून निघाले. त्यानुसार याची संपूर्ण माहिती सुदर्शनने मोबाईलवरुन या दरोड्याचा मुख्य सूत्रधार निलंबित पोलीस शिपाई शिवाजी भागडे याला दिली. या कटातील इतर दरोडेखोर त्याला ह्यसरह्ण म्हणून संबोधीत होते.त्याचे इतर पाच साथीदार मेहकर फाट्यावर उभे होते. सुदर्शनचा संदेश मिळाल्यानंतर शिवाजीने बँकेच्या गाडीचा महिंद्रा पिकअपने पाठलाग केला. नंतर गाडीला ओव्हरटेक करीत एका शेताजवळ महिंद्रा पीकअप आडवी लावून बँकेची गाडी अडविली. पाच दरोडेखोरांनी क्षणात कॅशव्हॅनवर हल्ला चढविला. आणि गाडीतील ३0 लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.यातील लहू जाधव या दरोडेखोरास परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी पकडले. एक दरोडेखोर हाती लागल्याने पोलिसांना नंतर एका-एका साथीदारास पकडण्यात यश आले.