लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरण आणि महापारेषणमधील कंत्राटी वीज कामगारांचे काम बंद आंदोलन १६व्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी स्थगित करण्यात आले. हा निर्णय संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी घेतला असून, २३ जून रोजी महावितरण आणि महापारेषणसोबत बैठक आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालक स्तरावर चर्चा झाली होती. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली. धोरणात्मक बदलाचे निर्णय ऊर्जामंत्री घेऊ शकतात. त्यामुळे जर महावितरण आणि महापारेषण कंपनीतील कामगारांच्या बाबत सकारात्मक निर्णय घ्यावयाचा असेल तर त्यासाठी दोन्ही स्तरावर बैठक होणे आवश्यक आहे. परिणामी, हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन स्थगित
By admin | Updated: June 9, 2017 02:22 IST