लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग़स़ बँकेचे संचालक मंडळ निलंबित करून प्रशासक नेमण्याचे आदेश सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झाले़ बँकेचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यातआला असून, बँकेवर जिल्हा उपनिबंधक जेक़े़ ठाकूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१२-१३मधील लेखापरीक्षण अहवालात काढण्यात आलेल्या आक्षेपांवर कार्यवाही न केल्याने ही कारवाई करण्यात आली. बँकेचे २३ हजार सभासदआहेत़ बँकेची धुळ्यात मुख्यशाखा असून, एकूण १८ शाखाआहेत़ नंदुरबार जिल्ह्यात बँकेचे सात हजारांपेक्षा अधिक सभासद असून, २१ संचालकांपैकी पाच संचालक नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. या कारवाईचा बँकेच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम झाला नसून बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार असल्याचे प्रशासक जेक़े़ ठाकूर यांनी स्पष्ट केले़
धुळे व नंदुरबार बँकेचे संचालक मंडळ निलंबित
By admin | Updated: May 23, 2017 03:03 IST