शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन अधिकाऱ्याला निलंबित करा!

By admin | Updated: March 4, 2017 01:52 IST

कांबळे यांच्याविरोधात मंडळातील महिला कर्मचाऱ्यास अश्लील चित्रफीत पाठवल्याबाबत शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : कामगार कल्याण मंडळातील प्रशासन अधिकारी संजय कांबळे यांच्या निलंबनासाठी वाघिणी संघटनेने मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. कांबळे यांच्याविरोधात मंडळातील महिला कर्मचाऱ्यास अश्लील चित्रफीत पाठवल्याबाबत शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे कांबळे यांचे निलंबन करण्याची संघटनेची मागणी आहे.यासंदर्भात संघटनेच्या अध्यक्षा ज्योती बडेकर यांनी सांगितले की, कांबळे यांच्यावर महिला कर्मचाऱ्याला अश्लील चित्रफीत पाठवल्याचा गंभीर गुन्हा ३ फेब्रुवारीला दाखल करण्यात आला आहे. मुळात या गंभीर गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तरी कांबळे यांच्याविरोधात प्रशासनाने शिस्तभंगाची निलंबनाची कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मात्र कारवाई करण्याऐवजी शासनाकडून या प्रकरणी टाळाटाळ सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि कामगार सचिवांना संघटनेने ८ मार्च या महिला दिनापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. महिन्याभरात ढिम्म बसलेल्या शासनाने ४ दिवसांत कारवाई केली नाही, तर ८ मार्चपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याआधी तक्रारदार महिला कर्मचाऱ्याने कल्याण आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवलेली आहे. मात्र मंडळाने द्वितीय श्रेणीतील या अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीत त्यांचेच कनिष्ठ मात्र द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील महिला सदस्यांचा समावेश आहे. या हास्यास्पद प्रकाराला तक्रारदार महिलेने कडाडून विरोधही दर्शवला. मुळात वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून करताना कितपत निष्पक्षपातीपणा असेल, यावर तक्रारदार महिलेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (प्रतिनिधी)>कल्याण आयुक्तांना निवेदन सादरतूर्तास तरी या प्रकरणी फौजदारी खटला दाखल झालेला असून, न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निष्पक्षपातीपणे निकाल लागण्यासाठी कांबळे यांचे निलंबन करण्याची मागणी तक्रारदार महिलेने कल्याण आयुक्तांना केली आहे.