शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू- काश्मीरहून सुखरूप घरी परतलेल्या रुपाली ठोंबरेंना पाहून सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:33 IST

Sushma Andhare: शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुणे विमानतळावर स्वागत केले.

जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या कुटुंबांसोबत पर्यटनासाठी गेल्या होत्या. सुदैवाने त्या आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित घरी परतल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन रुपाली ठोंबरे आणि त्यांच्या कुटुंबाचे पुणे विमानतळावर स्वागत केले. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे या रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे बुधवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत जम्मू- काश्मीरमध्येच होत्या. मात्र, आता त्या सुखरूप घरी पोहचल्या आहेत. दरम्यान, रुपाली ठोंबरे आपल्या कुटुंबासोबत पुणे विमानतळावर पोहोचल्या असता सुषमा अंधारे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मिठी मारली. यावेळी सुषमा अंधारे भावूक झाल्या आणि रुपाली ठोंबरे यांच्या गळ्यात पडून रडल्या, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे बुधवारी २.३० वाजताच्या सुमारास दोन-तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. ही संपूर्ण घटना जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरणा येथे घडली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर, पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. अतुल मोने (डोंबिवली), संजय लेले (डोंबिवली), हेमंत जोशी (डोंबिवली), संतोष जगदाळे (पुणे), कौस्तुभ गणबोटे (पुणे) आणि दिलीप देसले (पनवेल) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.