शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

२० हजार काडीपेटींचा संग्रह करणारा सुर्यकांत

By admin | Updated: June 30, 2016 20:44 IST

कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही़ सोलापुरातील एका अवलियाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० हजार काडीपेटींचा संग्रह आणि केवळ भारतातीलच नव्हे

- प्रभू पुजारी 

सोलापूर, दि. ३० - कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही़ सोलापुरातील एका अवलियाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० हजार काडीपेटींचा संग्रह आणि केवळ भारतातीलच नव्हे तर थायलंड, नेपाळ, दुबई या देशातील काडीपेटी मिळविण्याचा खटाटोप त्यांनी केला आहे़ काडीपेटीच्या विश्वात रमणाऱ्या अवलियाचे नाव आहे सूर्यकांत कामूऩकाडीपेटी जमा करण्याची नशा चढलेल्या सूर्यकांत कामून यांच्या खिशात नेहमी दोन-चार काडीपेटी असतातच़ त्यामुळे ही व्यक्ती विडी, सिगारेट ओढते की काय अशी शंका दुसऱ्यांना येणे साहजिक आहे, पण त्यांच्या वडिलांनाही ती आली आणि भरपूर मारही खावा लागला तो केवळ या काडीपेटी जमविण्याच्या छंदासाठी! पण मुलाला विडी, सिगारेट ओढण्याची सवय नसून केवळ आगळीवेगळी काडीपेटी जमविण्याचा छंद आहे हे कळल्यावर त्यांनाही आनंद झाला, असे सूर्यकांत कामून सांगत होते़ काडीपेटी़़़ आयताकृती आकाऱ़़ दोन बाजूला गुल़़़ वरच्या बाजूला रंगीत चित्र, ती पेटी उघडताच एका टोकाला गुल असलेली काडी दिसते़. एक पेटी आणि एक काडीचा उपयोग चूल, विडी, सिगारेट पेटविण्यासाठी केला जातोय, पण या काडीपेटींचा छंद म्हणून संग्रह केला तो सूर्यकांत कामून यांनी़ अनेकांनी बालपणी रिकामी काडीपेटी जमा करून रेल्वे, ट्रॅक्टर, ट्रक तयार करून त्याचा खेळही खेळला असेल? पण एक छंद म्हणून २० हजार काडीपेटी जमविणे हे केवळ सूर्यकांत कामूनच करू शकतात़ त्यांना एस़ टी़ स्टँड, रेल्वे स्टेशन, चित्रपटगृह, पानटपरी आदी सार्वजनिक ठिकाणी जास्त काडीपेटी मिळत गेल्या़ कचऱ्यात, गटारीत पडलेली काडीपेटी घेताना शेजारचे हसायचे, पण मला अभिमान वाटायचा की माझ्या संग्रहात एक - एक काडीपेटी वाढत असल्याचा, असे ते सांगत होते़काडीपेटीवर असणाऱ्या रंगीत चित्रामुळेच त्यांचा हा छंद वाढत गेला़ सुरुवातीला मदर इंडियाचे छायाचित्र असलेली काडीपेटी सापडली, ती जपून ठेवली़ त्यानंतर अभिनेता चिरंजीवी, नागार्जुन, रजनीकांत, कृष्णा, अमिताभ बच्चन, नर्गीस, मोहन बाबू, आरती अग्रवाल, कतरिना कैफ यांचे छायाचित्र असलेल्या काडीपेट्या सापडल्या. त्यातून अनेक छायाचित्र असलेल्या काडीपेट्या जमविण्याचा जणू छंदच जडला़.

 - काडीपेटीची कल्पक मांडणीसूर्यकांत कामून यांनी या काडीपेटींची मांडणीही अतिशय कल्पकतेने केली आहे़ २० हजार काडीपेटींपैकी ६ हजार काडीपेटी अशा आहेत की त्या एकमेकांशी मिळत्या-जुळत्या नाहीत़. काडीपेटीच्या संग्रहाचे चार अल्बमच त्यांनी तयार केले आहेत़ हे अल्बम पाहताना खूपच आकर्षक वाटतात़ पाहणाराही थक्क होऊन जातो़.

काडीपेटींवरील चित्र...- देव : गणेश, श्रीकृष्ण, तिरुपती बालाजी, राम़- फुले : कमळ, गुलाब, गुलमोहोऱ- फळे : सफरचंद, मोसंबी, डाळिंब, चिक्कू, संत्रा, लिंबू, आंबा़- ऐतिहासिक वास्तू : गेट वे आॅफ इंडिया, ताजमहाल, चार मिनार, हावडा ब्रीज, झुलता मिनाऱ- पाळीव व जंगली प्राणी : गाय, बैल, घोडा, कुत्रा, मांजर, हरिण, कोल्हा, सिंह, वाघ, हत्ती, उंट, झेब्रा, डायमंड़- पक्षी : मोर, पोपट, राजहंस, कावळा, कोंबडा़- वाहने : कार, जीप, सायकल, जहाज, टेम्पो, बस, रेल्वे़- खेळ : बॉल, बॅट, स्टंप, फुटबॉल, नेट, आयपीएल गोल्ड, वल्ड कप़- हत्यार : बंदूक, हातोडा, तलवाऱ- संगीत : तबला, सितार, बासरी, गिटाऱ- तसेच कंदील, विडी बंडल, माणिकचंद, जोकर, शेतकरी, टांगावाला, हमाल, मराठी, इंग्रजी अंकलिपी, भोवरा, धनुष्यबाण, तुळशी वृंदावन, त्रिशूल, ओम, स्वस्तिक, चक्र, समई, चंदन, खारुटी, चावी आदी विविध प्रकारचे चित्र असलेल्या २० हजार काडीपेटींचा संग्रह सूर्यकांत कामून यांनी जमा केला आहे़.

संख्या घटतेय !- पूर्वी प्रत्येकाच्या घरी चूल असायची आणि ती पेटविण्यासाठी घरात काडीपेटी असायचीच़ घरात पाहुणे आले की चहापाणी झाले की सुपारी, विडी व काडीपेटी असायची, पण तेही आता कमी झाले़ गल्लोगल्ली, चौकात पानटपरी झाली, पण गुटखा, मावा खाणाऱ्यांची संख्या वाढली़ काही जण सिगारेट ओढतात पण लायटरद्वारे ती पेटवितात़ परिणामी विडी ओढणाऱ्यांची संख्या कमी झाली आणि काडीपेटींची संख्याही घटत आहे़हिंदी, मराठी चित्रपट व अभिनेते, अभिनेत्री यांच्या जीवनपटाबद्दलही माहिती गोळा करून लेखन करण्याची आवड आहे़ याबरोबरच गेल्या २० वर्षांपासून काडीपेटी संग्रह करण्याचा छंद जडला़ एक-एक काडीपेटी गोळा करीत आता २० हजार काडीपेटींचा संग्रह तयार झाला आहे़ त्यात विविध प्रकारच्या काडीपेटींचा समावेश आहे़ आपण काही तरी वेगळे करतो, याचा अभिमान आहे़- सूर्यकांत कामून,काडीपेटीचा संग्रह करणारे