रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या जोडपे समुद्रात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी औरंगाबाद येथील एका पर्यटकाने पुढाकार घेतला. मात्र दुर्दैवाने तिघेही बुडण्याचा प्रसंग ओढवला होता. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी या तिघांचेही प्राण वाचवले आहेत. नीलम जौंजाळ, विनायक जौंजळ आणि सुरेश तायडे अशी या तिघांची नावे आहेत. सोमवारी सकाळी ९.३५ वाजता हा प्रकार घडला.इस्लामपूर येथील विनायक शिवाजी जौंजाळ (३६) आणि त्यांची पत्नी नीलम फिरण्यासाठी म्हणून गणपतीपुळे येथे आले आहेत. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी समुद्रात गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात ओढले गेले. हे लक्षात येताच सुरेश माणिकराव तायडे (३२, अंधारी, ता. शिल्लौर, जि. औरंगाबाद) त्यांना वाचवण्यासाठी पुढे झाले. मात्र खोल पाण्यात तेही गटांगळ्या खाऊ लागले.तोपर्यंत आरडाओरड सुरू झाल्याने किनाऱ्यावरील जीवरक्षक अनिकेत राजवाडकर, आशिष माने, मयुरेश देवरूखकर, अक्षय माने आणि मोरया वॉटटर स्पोर्ट्स अँड बीच असोसिएशनच्या सदस्यांनी या तिघांनाही सुखरूप पाण्याबाहेर काढले.
गणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 15:12 IST
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या जोडपे समुद्रात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी औरंगाबाद येथील एका पर्यटकाने पुढाकार घेतला. मात्र दुर्दैवाने तिघेही बुडण्याचा प्रसंग ओढवला होता. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी या तिघांचेही प्राण वाचवले आहेत. नीलम जौंजाळ, विनायक जौंजळ आणि सुरेश तायडे अशी या तिघांची नावे आहेत. सोमवारी सकाळी ९.३५ वाजता हा प्रकार घडला.
गणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना वाचवले
ठळक मुद्देगणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना वाचवलेइस्लामपूरमधील जोडप्यासह पुण्याच्या एका पर्यटकाचा समावेश