शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाच नक्षल्यांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: November 1, 2016 05:51 IST

प्लाटून दलम सदस्यांसह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी ३० आॅक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले

गडचिरोली : प्लाटून दलम सदस्यांसह १२ लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षल्यांनी ३० आॅक्टोबर रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये करण ऊर्फ दुलसा पेका नरोटी (२३) रा. गोरगुट्टा ता. एटापल्ली, प्रवीण ऊर्फ विलास देवाजी कोल्हा (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी (२०) रा. गुंडझूर ता. एटापल्ली, दरजू कुल्ले उसेंडी (२३) रा. नैनगुडा ता. एटापल्ली, रैजी नळगू गावडे (३०) रा. बेरईवाडा ता. पाखांजूर जि. कांकेर (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे हा २००८ मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला. नंतर त्याला प्लाटून क्रमांक १४ मध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून तो नोव्हेंबर २०१४ पर्यंत त्याच ठिकाणी कार्यरत होता. याचदरम्यान नक्षल्यांनी घडवून आणलेल्या दोगुर चकमक, कोरपल्ली चकमक, मिरकल फाटा चकमक, रानू धुर्वा याचा खून, गुड्डीगुडम बिटाच्या जाळपोळ प्रकरणात त्याचा सहभाग होता. त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. प्रवीण ऊर्फ देवाजी कोल्हा हा २०१२ मध्ये कसनसूर दलममध्ये सहभागी झाला. सप्टेंबर २०१६ पर्यंत तो कसनसूर दलम सदस्य पदावर कार्यरत होता. यादरम्यान कुंडूम चकमक, दोबेगुडा चकमक, पैडी-कोटमीदरम्यान डांबरी रस्ता खोदणे, जारावंडी-कसनसूर मार्गावरील जवेली फाट्यावर बॅनर बांधणे यामध्ये प्रवीणचा सहभाग होता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.शारदा ऊर्फ रिना वत्ते पुंगाटी ही नोव्हेंबर २०१२ मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली. तिला भामरागड दलममध्ये पाठविण्यात आले. तेव्हापासून ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. यादरम्यान कुचेर चकमकित तिचा सहभाग होता. तिच्यावर दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दरजू कुल्हे उसेंडी हा कसनसूर दलममचा पार्टटाईम मेंबर म्हणून कार्यरत होता. त्याच्या या कार्यकाळात तो एकाही गुन्ह्यामध्ये त्याने सहभाग घेतला नव्हता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते. रैजी नळगू कातवो हा सन २००२ ते २००७ पर्यंत काकनार दलमचा पार्टटाईम मेंबर म्हणून कार्यरत होता. यादरम्यान वच्छाघाट चकमक, आमगेटा येथील तलाठी कार्यालयाची तोडफोड, गुड्डी नरोटीचा खून, निवडणूक प्रचार, वाहन जाळपोळ, ख्रिश्चन ब्रदर्स, स्कूल कुडली येथे काळा ध्वज फडकाविणे या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्यावर दोन लाखांचे बक्षीस होते.