शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरेशदादा जैन यांना वैद्यकीय रजा मंजूर

By admin | Updated: July 19, 2014 02:31 IST

जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आमदार सुरेशदादा जैन यांना मुंबईत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी विशेष न्यायालयाने १७ दिवसांची रजा मंजूर केली आहे.

धुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील संशयित आमदार सुरेशदादा जैन यांना मुंबईत वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी विशेष न्यायालयाने १७ दिवसांची रजा मंजूर केली आहे. सहा आॅगस्टला सायंकाळी त्यांना पुन्हा कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. आमदार सुरेशदादा जैन यांनी वैद्यकीय उपचार आणि मुलाकडे धार्मिक कार्यक्रमाला हजर राहता यावे, यासाठी २० जुलै ते २० आॅगस्ट अशी एक महिन्यांची रजा मिळावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. सरकारी वकील शामकांत पाटील यांनी त्यास हरकत घेतली. बचाव पक्षाच्या वकीलांनी भेटीची वेळ घेतलेल्या डॉ. पिल्लई, डॉ. रईस, डॉ. भट्टाचार्य, डॉ. मुन्शी, डॉ. शहा यांच्या नावांची यादी न्यायालयात सादर केली.त्यानंतर न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना २१ जुलै ते ६ आॅगस्टपर्यंत पोलीस बंदोबस्त अनिवार्य करत रजा मंजूर केली. त्यांना २१ तारखेला सकाळी आठ वाजता येथून पोलीस बंदोबस्तात जावे लागेल आणि ६ आॅगस्टला सायंकाळी धुळे कारागृहात हजर व्हावे लागेल, असे सरकारी वकीलांनी सांगितले. (प्रतिनिधी)