शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

‘सुरेल’ पहाट!

By admin | Updated: February 20, 2016 01:42 IST

मासुंदा तलावाभोवती हजारो नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी, तलावाभोवती दिव्यांचा लखलखाट, तरंगत्या रंगमंचावर आकाश कंदिलांची सजावट आणि दुसरीकडे राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या सुरेल आवाजातून सादर केलेली

मासुंदा तलावाभोवती हजारो नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी, तलावाभोवती दिव्यांचा लखलखाट, तरंगत्या रंगमंचावर आकाश कंदिलांची सजावट आणि दुसरीकडे राहुल देशपांडे व आनंद भाटे यांच्या सुरेल आवाजातून सादर केलेली नाट्यगीते आदींनी नाट्यसंमेलनाची पहिली पहाट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेली. बंदिशी, नाट्यपद, भजन या सादरीकरणाने प्रेक्षक आनंदून गेले. मासुंदा तलावात तरंगत्या रंगमंचावर नाट्यसंगीत ऐकण्याचा एक आगळावेगळा अनुभव नाट्यरसिकांनी अनुभवला.देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘सुमन साहेब सुलतान’ या बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद सादर केले. ‘एरी माहिया आज शुभमंगल गावो’ ही बंदिश भाटे यांनी सादर केल्यावर ‘सोहमपर डमरू बाजे’ हे नाट्यपद सादर केले. ‘जयशंकरा गंगाधरा’ हे गीत देशपांडे यांनी तर भाटे यांनी ‘रात्रीचा समय सरुनि’ सादर केले. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला १०० दिवस पूर्ण झाल्याचे सांगत देशपांडे यांनी स्वत: गायलेले ‘दिल की तपीश आज आफताब’ हे नाट्यपद सादर केले. त्यानंतर, भाटे यांनी ‘खरा तो प्रेमाला धरी लोभ मनी’ हे गीत सादर केले. देशपांडे व भाटे यांच्या भजनांची मेडली रंगली व या मेडलीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ‘राजसा सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘हरि विठ्ठल नामाचा गजर’, ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’, ‘चिन्मया सकल हृदया’ या भजनांनी कार्यक्रमाची सांगता केली. तबल्यावरील साथ प्रसाद पाध्ये यांनी, तर हार्मोनिअमवरील साथ आदित्य ओक यांची होती. त्यानंतर, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे यांनी सहभागी कलाकारांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. निवेदन अश्विनी कानोलकर यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या मुख्य कार्यक्रमांस शुक्रवारपासून सुरुवात झाली. संमेलनपूर्व कार्यक्रमात पहाटे मासुंदा तलाव येथील तरंगत्या रंगमंचावर नाट्यसंगीताचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांची गर्दी आणि नाट्यसंमेलनाचा माहोल पाहून गायक राहूल देशपांडे यांनी दिवाळी पहाट पुन्हा अवतरल्याचा प्रत्यय येत असल्याचे सांगत नाट्यरसिकांच्या उपस्थितीचे कौतुक केले.