शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बढतीमधील आरक्षणासाठी राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात : सामाजिक न्यायमंत्र्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 20:56 IST

मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे.

अमरावती, दि. 25 -  मागासवर्गीय कर्मचा-यांची बढतीतील पदोन्नती रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहे. त्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाने पुढाकार घेतला असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने सन २००४ पासून अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गांना नोकरीतील बढतीत पदोन्नती आरक्षण लागू केले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मागासवर्गिय कर्मचाºयांना बढतीतील आरक्षण रद्द केले आहे. हा फटका राज्यसेवेतील ४९ विभागांतील सुमारे चार लाख कर्मचा-यांना बसणार आहे. ही बाब मागासवर्गिय कर्मचा-यांसाठी अन्यायकारक असल्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्ण घेण्यात आला आहे. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. बढतीतील आरक्षण कायम राहावे, यासाठी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरिष साळवे यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे मागासवर्गिय कर्मचा-यांना न्याय मिळावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले जाईल, अशी माहिती आहे.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निणयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. ती तत्वत: मान्य झाली आहे. दर महिन्याला समितीकडून आढावा घेतला जाईल.- राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार