शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पाठविली मुंबई हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 12:07 IST

दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.

ठळक मुद्देदहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली.या सुनावणीत दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली आहे.महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे

नवी दिल्ली, दि. 1- दहीहंडीच्या उंचीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत दही हंडीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. तसंच 7 ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करण्याचे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाला निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता पुढील सुनावणी 7 ऑगस्टला होणार आहे. वीस फूट उंचीसह गोविंदाचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता.सण व संस्कृती जपण्याच्या सबबीखाली आयोजकांनी सरकारला हे नियम शिथिल करण्यासाठी साकडं घातलं आहे. मात्र सध्यातरी सरकारच्या हाती काहीच नसल्याने सरकारनेही नियमांत बदल करण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. गोविंदांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करणार; याबाबत राज्य शासनाला लेखी अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करायचा होता. पण आता सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबतची याचिका पुन्हा मुंबई हायकोर्टाकडे पाठविल्याने आता गोविंदा पथकांना हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. गोविंदा पथकांवरील निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत आयोजकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कित्येक आयोजकांनी दहीहंडीसाठी लावलेल्या बक्षीस रकमेतही कपात केली आहे.गुरुपौर्णिमेपासून गोविंदांनी मनोरे उभे करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वच गोविंदांना असे वाटत आहे की, निर्बंध उठविले जातील. तसे झाल्यास गोविंदांचा उत्साह वाढेल. गोविंदांच्या सुरक्षेबाबत शासन लेखी भूमिका मांडेल. आपणही त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. समितीच्या पुढील उपक्रमांची दिशा न्यायालयाच्या निर्णयानंतर ठरविण्यात येईल, असे दहीहंडी समन्वय समितीकडून सांगण्यात आलं होतं.सध्या शहरात गोविंदा आणि दहीहंडी पथके दहीहंडीचा सराव करण्यात व्यस्त आहेत. गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या सरावाची तयारी सुरू झाली आहे. पण यंदा दहीहंडीला नोटाबंदीचा फटकासुद्धा बसण्याची शक्यता आहे, असे मतही गोविंदा पथकांकडून व्यक्त केले जात आहे. तर सरावाच्या वेळी जितके थर लावता तितकेच थर दहीहंडीच्या दिवशी लावा. त्याहून अधिक थर लावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन गोविंदा आणि गोविंदा पथकांना करण्यात येत आहे.