शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

सुप्रीम कोर्टाचे सर्वाधिक न्यायाधीश मूळचे मुंबईचे

By admin | Updated: November 14, 2016 05:48 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे,

अजित गोगटे / मुंबईसर्वोच्च न्यायालयाच्या गेल्या ६६ वर्षांच्या इतिहासात या न्यायालयावर नेमल्या गेलेल्या न्यायाधीशांमध्ये मुंबईहून गेलेल्या न्यायाधीशांचे स्थान अव्वल राहिले आहे, तसेच देशाच्या आत्तापर्यंत झालेल्या एकूण ४३ सरन्यायाधीशांपैकी सर्वाधिक सरन्यायाधीशही मुंबईनेच दिले आहेत.भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाल्यानंतर, दोन दिवसांनी दिल्लीतील टिळक मार्गावरील सध्याच्या वास्तूत सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरू झाले. थेट वकिलांमधीन नेमल्या गेलेल्या काही न्यायाधीशांचा अपवाद वगळता, गेल्या ६६ वर्षांत सर्वोच्च न्यायालयावरील न्यायाधीश देशभरातील २३ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना बढत्या देऊन नेमले गेले आहेत. सरन्यायाधीश न्यायाधीशांमधील सेवाज्येष्ठतेनुसार नेमले जातात. सर्वोच्च न्यायालयातील नेमणुकांमध्ये विविध राज्ये, महिला अथवा मागासवर्गीय यांच्यासाठी कोणताही ‘कोटा’ नसला तरी शक्यतो प्रत्येक उच्च न्यायालयातून एक तरी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयावर यावा, असा प्रयत्न केला जातो.सर्वोच्च न्यायालयावर गेल्या ६६ वर्षांत झालेल्या न्यायाधीशांच्या नेमणुकांचे विविध निकषांवर विश्लेषण करणारा मुरली कृष्णन यांचा एक माहितीपूर्ण लेख ‘बार अ‍ॅण्ड बेंच’ या कायदेविषयक नियतकालिकाच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. हे विश्लेषण करताना संबंधित न्यायाधीशाची सर्वप्रथम ज्या उच्च न्यायालयावर नेमणूक झाली ते त्याचे मूळ न्यायालय (पॅरेन्ट हायकोर्ट) असे मानून हे विश्लेषण करण्यात आले आहे. १९९३ मध्ये न्यायाधीश निवडीची ‘कॉलेजियम’ची पद्धत लागू झाल्यानंतरच्या नेमणुका व त्याआधीच्या नेमणुका अशा दृष्टीनेही त्यात विश्लेषण केले गेले आहे.