शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली दडपशाही?

By admin | Updated: August 25, 2016 06:11 IST

सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे

मुंबई : अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असून, या पुढे लग्न समारंभ, वाढदिवस, पूजा अथवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या विशेषाधिकारावर गंडांतर आणणारा आणि पोलिसांना अमर्याद अधिकार बहाल करणाऱ्या या प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायदा हा आणीबाणीच्या काळातील मिसा कायद्याची आठवण करून देणारा असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षांनी चालविली आहे, तर या कायद्याच्या माध्यमातून कुठलाही दबाव जनतेवर आणण्याचा हेतूच नसल्याची भूमिका आज राज्य शासनाने स्पष्ट केली.प्रस्तावित महाराष्ट्र अंतर्गत सुरक्षा कायद्याचा मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर १९ आॅगस्ट रोजी टाकण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी आज आपल्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेऊन शासनाची बाजू मांडली. या मसुद्याचा अभ्यास न करताच, टीव्हीवरील चर्चांमधून त्यावर टीका केली जाते आणि अशी चर्चा निकोप नसते, असे बक्षी म्हणाले. हा मसुदा अधिकाऱ्यांच्या पातळीवर तयार करण्यात आला असून, तो अद्याप मुख्यमंत्री वा मंत्र्यांपर्यंत गेलेला नाही, असे सांगतानाच बक्षी यांनी, ‘या पुढे गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी कायद्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यानंतर तो वेबसाइटवर टाकण्यापूर्वी आम्ही प्रेससमोर जाऊ,’ असे सांगितले. ‘या मसुद्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यानंतरच अंतिम मसुदा होईल,’ असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>लग्न सोहळ्याला परवानगीलग्न, वाढदिवस, पूजा आदी कौटुंबिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठीदेखील यापुढे पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असे या मसुद्यात म्हटले आहे. के. पी. बक्षी यांनी याबाबत स्पष्ट केले की, खासगी जागेत हा समारंभ असेल, तर परवानगीची गरज नसेल. मात्र, सार्वजनिक ठिकाणी असेल, तर परवानगी अनिवार्य असेल. >सात सदस्यीय समितीया कायद्यासाठी सात सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. गृहमंत्री हे समितीचे अध्यक्ष असतील. समितीत गृह राज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयकुत आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख हे सदस्य असतील. त्यात विरोधी पक्षाचा एकही सदस्य का नाही, या प्रश्नात बक्षी म्हणाले, अंतर्गत सुरक्षेच्या विषयात विरोधी पक्षाची व्यक्ती शासकीय समितीमध्ये नसते. >... केवळ १२० पोलीसराज्यात आज एक लाख नागरिकांच्या मागे केवळ १२० पोलीस कर्मचारी आहेत. एकीकडे नागरीकरण वाढत असताना पोलीस दलावरील ताण वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, या सकारात्मक हेतूने हा कायदा आणला जात असल्याचे के. पी. बक्षी यांनी स्पष्ट केले. मकोका कायद्याला १९९९ मध्ये विरोध झाला होता, असेही ते म्हणाले. >राज्यातील युती सरकारने अंतर्गत सुरक्षेसंदर्भात मांडलेला नव्या विधेयकाचा मसुदा पूर्णत: असंवैधानिक असून या माध्यमातून राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.-राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते