शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दबावाने साक्ष; सलमानच्या वकिलाचा आरोप

By admin | Updated: May 7, 2014 15:14 IST

पोलिसांच्या दबावाने साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत असल्याचा आरोप सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़

मुंबई : सलमान खान चालकाच्या सीटवरून गाडीतून उतरला होता, असे मुस्लीम शेखने दंडाधिकारी न्यायालयासमोर २००६ मध्ये दिलेल्या साक्षीत म्हटले नव्हते़ त्यामुळे पोलिसांच्या दबावाने साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत असल्याचा आरोप सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़ मात्र आपण दंडाधिकारी न्यायालयासमोरही अशीच साक्ष दिली होती़ पण त्याची नोंद का करून घेतली नाही, हे मला माहिती नसल्याचे शेखने न्यायालयाला सांगितले़ ही घटना घडली तेव्हा तेथे जमलेल्या गर्दीने सलमानला गाडीतून उतरण्यास सांगितले़ त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा पोलीस सुरक्षारक्षक होता़ तोही गाडीतून बाहेर पडला व त्याने तेथे जमलेल्या नागरिकांना समजवल्याने सलमानला तेथून पळ काढता आला, असेही त्याने साक्षीत सांगितले़ पठाणने आपण सलमानला गाडीच्या पुढील बाजूच्या उजव्या दिशेच्या दरवाजाने बाहेर पडताना पाहिल्याचे न्यायालयाला सांगितले़ खानने मात्र सलमान नेमका कोणत्या दिशेने बाहेर पडला हे सांगणे कठीण असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले़ दरम्यान, भरपूर नुकसानभरपाईचे आमिष या तिन्ही साक्षीदारांना दाखवले असून, त्यामुळेच हे साक्षीदार सलमानविरुद्ध साक्ष देत आहेत, असा आरोपही अ‍ॅड़ शिवदे यांनी केला़ तो साक्षीदारांनी फेटाळून लावला़ यातील इतर तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष २१ मे रोजी नोंदवणार आहे़ ही घटना २००२ मध्ये घडली़ गेल्या वर्षी न्यायालयाने सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित करण्यास परवानगी दिली़ या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग केला़ (प्रतिनिधी) साक्षीदाराला धमकी साक्षीदार मुस्लीम शेखला रविवारी निनावी फोन आला होता व त्याला या खटल्यात सलमानविरुद्ध साक्ष न देण्याची धमकी दिली होती़ या धमकीबाबत पोलिसांनी न्यायालयाला सांगितले़ त्याची दखल घेत या निनावी फोनची चौकशी करून त्याचा अहवाल १९ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले़