शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

समजा, आज तुमची नोकरी गेली तर..? विचार करा काय वेळ येईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:41 IST

Financial Problems: समजा, उत्पन्न १०० रुपये, खर्च ९९ रुपये... तरी बरं चालतं आयुष्य; पण उत्पन्न ९९ रुपये आणि खर्च १०० रुपये असं झालं की घोळ झालाच!

समजा, उत्पन्न १०० रुपये, खर्च ९९ रुपये... तरी बरं चालतं आयुष्य; पण उत्पन्न ९९ रुपये आणि खर्च १०० रुपये असं झालं की घोळ झालाच!असं अनेकांचं होतं. मोठं होम लोन, त्याचा मोठा हप्ता. पगाराच्या ४५ टक्के तर दरमहा होम लोन जातं. एरव्ही लोक ते रेटूनही नेतात; पण फ्लोटिंग रेट जरा जरी बदलला तरी गडबड होते.

उंटाच्या पाठीवरच्या शेवटच्या काडीसारखा भार वाढतो, उंट बसायला लागतो. असं का होतं? अचानक खर्च वाढले, आजारपण आलं,  पगारकपात, ले-ऑफ मिळाला की एकदम सगळा खर्चाचा डोलारा कोसळतो. म्हणून वेळेत विचार करावा- आपला पगार आणि खर्च, लाइफस्टाइल यांचा मेळ आज बसतो आहे, पण  उद्या काही गडबड झाली तर? त्याची तजवीज आजच करायला पाहिजे. अंथरुन पाहूनच पाय पसरायला पाहिजेत. त्यापेक्षा आजचं आपलं पांघरुन भविष्यात आखूड होणार आहे हे गृहित धरायला हवं. त्यासाठी स्वत:ला विचारायचे हे काही प्रश्न -

१. समजा, या महिन्यात पगार नाहीच झाला तर.. कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही झाला, काम थांबवा तडकाफडकी असं म्हणाले तर? किंवा हातपाय मोडला, कावीळच झाला आणि बिनपगारी रजा घ्यायची वेळ आली तर? घराचे हप्ते थकतील का? मुलांचं शिक्षण थांबेल का? किराणा तरी घरात किती काळ भरू शकाल? सहा महिने निभावून नेऊ इतपत पैसा गाठीशी आहे का? या प्रश्नांची उत्तरं देताना जर भीती वाटत असेल तर तुम्हाला स्वत:च्या आर्थिक तब्येतीकडे तातडीने लक्ष द्यायला हवं.

२. इर्मजन्सी फंड आहे का? नसेल तर तातडीने तयार करा. सहा महिने जरी पगार झाला नाही तर आज जगतोय तितपत पैसा हाताशी राहील, अशी व्यवस्था तयार हवी. या इर्मजन्सी फंडाला हात लावायचा नाही.

३. क्रेडिट कार्डांची बिलं थकली आहेत का? क्रेडिट कार्डावर अनेकांचे संसार चालतात, जेमतेम ड्यू डेटला आवश्यक तेवढे पैसे भरून टाकतात, मग बाकी खरेदी सुरूच. कपडे, वीज आणि मोबाइल बिलं, किराणा हे सारं जर तसं भरत असाल तर तुमची आवक कमी, जावक जास्त आहे. 

४. बचत किती, गुंतवणूक किती, खर्च किती? याचं उत्तर स्वत:लाच द्या. तातडीने खर्च कमी करून पहिल्या दोन गोष्टी वाढवा, स्टार्ट लिव्हिंग ऑन बजेट!- पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार

टॅग्स :jobनोकरीInvestmentगुंतवणूक