शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

'लाेकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस् २०२४' साठी तज्ज्ञांचे सुपर ज्युरी मंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 09:44 IST

संपूर्ण राज्याचे आकर्षण असणाऱ्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.  

मुंबई : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०२४ या सुपर पुरस्काराचे सर्व मानकरी आपापल्या क्षेत्रातील खरेखुरे सुपर हीरोज आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सन्मान सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या सोहळ्यासाठी विविध ११ क्षेत्रांतून नामांकने करण्यात आली आहेत. त्यांची निवड करण्याकरिता तज्ज्ञांचे सुपर ज्युरी मंडळ करण्यात आले आहे. 

संपूर्ण राज्याचे आकर्षण असणाऱ्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे.  त्यामध्ये समाजसेवा, आयएएस (प्रॉमिसिंग), आयपीएस (प्रॉमिसिंग), क्रीडा, शिक्षक, वैद्यकीय, कृषी, उद्योग आणि राजकारण या कॅटेगरीमधून राज्यभरातून नामांकने आली आहेत. यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लोक या नॉमिनीजसाठी मतदान करत आहेत. मतदानासाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या ज्युरी मंडळात खालील मान्यवरांचा समावेश आहे. 

 डॉ. विजय दर्डालोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी तीनवेळा राज्यसभेवर सदस्य म्हणून काम केले आहे. यवतमाळ-नांदेड रेल्वे सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

 सुधीर मुनंगटीवारराज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या विभागात बरेच बदल केले. वनविभागाविषयी त्यांची आस्था सर्वश्रूत आहेच, तसेच सांस्कृतिक विभाग सांभाळताना राज्यात ७५ नाट्यगृहे उभारण्याची त्यांची घोषणा नाट्यप्रेमींना सुखावून गेली.  

धनंजय मुंडेतरुण वयात राजकारणात प्रवेश केलेल्या मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना अनेक विषयांना वाचा फोडली. सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून विभागाला आकार देण्याचा प्रयत्न केला. कृषिमंत्री या नात्याने ते थेट बांधावर पोहोचले.

 देवेन भारतीमुंबई विशेष पोलिस आयुक्त असणाऱ्या भारती यांची गुन्हेगारी विश्वाचे कर्दनकाळ आहेत. पोलिस विभागातील संवेदनशील पदावर काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. पोलिसांच्या बळकटीकरण व दहशतवादविरोधी कारवाया थोपविण्यात त्यांनी माेलाचे काम केले आहे.  

 सोनू निगम  राष्ट्रीय पुरस्कार विजेते सोनू निगम यांनी तरुणाईच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने गारुड केले आहे. निगम यांची हिंदी सिनेमातील गाणी गाजलेली आहेत. चित्रपटाच्या गायनासाठी प्रसिद्ध असणारे निगम यांना केंद्र सरकारने पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

  रमेश दमाणीएव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड (डी.मार्ट) चे अध्यक्ष असणाऱ्या दमाणी यांनी देशभरात सुपर मार्केटची चेन सुरू केली. डी. मार्ट नावाने ती प्रसिद्ध आहे. दमाणी यांना देशातील ‘रिटेल किंग’ म्हणून ओळखले जाते. २००२ साली सुरू करण्यात आलेल्या डी. मार्टची देशात ३००पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. डी. मार्टच्या व्यतिरिक्त दमाणी यांनी मीडिया, टेक्सटाइल्स, रिअल इस्टेट या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.  

 नमिता थापर  एमक्योर फार्मास्युटिकल्स लि. च्या कार्यकारी संचालक असलेल्या थापर प्रसिद्ध असणाऱ्या शार्क टँक इंडिया  कार्यक्रमाच्या परीक्षक आहेत. औषधनिर्माण कंपनीतून त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्या सध्या या कंपनीत कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. ७० देशात त्यांच्या कंपनीचा विस्तार आहे.   

 महेश काळेशास्त्रीय गायक महेश काळे हे भारतीय शास्त्रीय, अर्ध-शास्त्रीय, नाट्यसंगीतासह भक्ती संगीतासाठी ओळखले जातात. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महेश यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे. ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीतात अनेक प्रयोग केले.

 डॉ. विजय भटकरनालंदा विद्यापीठाचे कुलपती असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी भारतीय परम संगणकाच्या निर्मितीत महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  भारतातील  सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीशी त्यांचे नाव जोडले आहे. सी.डॅकचे संस्थापक. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविले आहे. 

 डॉ. अमित मायदेवसर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोसायन्सचे अध्यक्ष डॉ. मायदेव गेली ३५ वर्षे पोटविकार या विषयात काम करत आहेत. राजकारणी, सेलेब्रिटी ते सामान्य नागरिकांना उपचार देण्यासाठी ते दिवसरात्र झटत असतात. पोटविकार विषयातील अत्याधुनिक उपचारपद्धती भारतात सुरू करण्यात त्यांचा वाटा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 पोपटराव पवारआदर्श गाव कार्यक्रमाचे सक्रिय अध्यक्ष व हिवरे बाजारचे माजी सरपंच असलेले पोपटराव पवार यांनी ग्रामविकास आणि शाश्वत शेतीसाठी त्यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. राज्य सरकारच्या आदर्श ग्राम योजनेचे ते कार्यकारी संचालक आहेत. 

 राजीव पोद्दार बालकृष्ण टायर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक असलेल्या राजीव पोद्दार यांनी टायर्स निर्मितीच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या बालकृष्ण टायर्स लिमिटेड कंपनीत नावीन्यपूर्ण बदल घडवून आणले आहेत. क्रीडा क्षेत्रात विशेष आवड असणाऱ्या पोद्दार यांनी क्रिकेट वर्ल्ड कपचे प्रायोजकत्व स्वीकारून कंपनीचा ब्रॅण्ड मोठा केला. पोद्दार केवळ उद्योगपती नसून तर नवनवे प्रयोग कसे करता येतील, यावर त्यांचा भर असतो. व्यवसाय विस्तारासाठी कल्पक योजना ते आखत असतात. 

 ऋषी दर्डालोकमत मीडिया समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा हे कुशल संघटक आहेत. त्यांनी विविध पंतप्रधानांसोबत परदेश दौरेही केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकमतने डिजिटल क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे.

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023Lokmatलोकमत