शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:24 IST

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले.

कोल्हापूर/सांगली/सातारा : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. या भागातील पूरही ओसरू लागला असला तरी त्याची गती संथ आहे. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्यही वेगाने सुरू आहे. मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, धान्य आणि भाज्यांची तीव्र टंचाई पूरग्रस्त भागात जाणवत आहे.ब्रह्मनाळ येथे गुरुवारी बोट बुडून जे वाहून गेले होते, त्यातील पाच जणांचे मृतदेह आज पूर ओसरू लागल्याने सापडले.कोल्हापूर, सांगलीत भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वांगी २०० रुपये किलो, पालेभाज्या १२५ ते १६० रुपये किलो, तर कोथिंबीर जुडी १०० रुपये भावाने विकली जात आहे. एटीएम बंद असल्याने खिशात रोकड नाही.शुक्रवारी दुपारपर्यंत कोल्हापूरमधील चौदापैकी दोन पंपांवर उपलब्ध असलेले पेट्रोल व डिझेल संपल्यानंतर ते बंद करण्यात आले. प्रत्येक दुचाकीत जास्तीतजास्त शंभर रुपयांचे पेट्रोल दिले जात होते. पंपावर लांबच लांब रांगा होत्या. पाच तासांच्या वाटपानंतर चौदा पंपांवरील पेट्रोल संपले.कोल्हापूरात ८४ रुपये किलो असलेली तूरडाळ १२५ रुपये किलो, १०० रुपयांच्या आसपास असलेला मसूर २०० रुपये, तर मटकी १६० रुपयांनी विकली जात आहे. सांगली जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. भाज्या अभावानेच मिळत आहेत. राज्याला दूधपुरवठा करणाऱ्या या पट्ट्यातच दूध मिळेनासे झाले आहे. त्यामुळे काही दूध संघ, स्थानिक संस्था व व्यक्तींना मोफत दूधपुरवठा केला.क-हाड, पाटणचा महापूर ओसरलासातारा जिल्ह्यातील पाटणसह क-हाड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दोन्ही तालुक्यांतील पूर ओसरला असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणाचे वक्री दरवाजे पाच फुटांवर आणण्यात आले. सध्या नदीपात्रात ४५ हजार २६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर आवक ५१ हजार २६७ क्युसेकने सुरू आहे. पाणीसाठा १०२.८६ टीएमसी आहे.सांगलीत पूर ओसरतोय इंचाइंचानेसांगलीत अद्यापही ६० टक्के भाग पाण्याखाली असून, नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. पूर इंचाइंचाने ओसरत आहे. कोल्हापूर व सांगलीतील पूर पूर्णत: ओसरण्यास आणखी किमान ७२ तास लागतील, अशी अपेक्षा असून, त्यानंतर जनजीवन सुरळीत होईल, मात्र त्यावेळी रोगराई पसरण्याची भीती आहे. तसेच पुढील तीन-चार दिवस पाऊ स पडता कामा नये.पूरग्रस्तांना पूर्वीपेक्षा अधिक भरपाई : मुख्यमंत्रीसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते म्हणाले की, अपंगत्व आल्यास पूर्वी ४३ हजार रुपये दिले जात, आता दोन लाख रुपये देण्यात येतील. उपचारासाठीसुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे. घर पडले तर पूर्वी ६० हजार रुपये भरपाई होती, आता एक लाख भरपाई मिळेल.जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची मदत केली जाईल. जेथे उद्योग, व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांच्याबाबतही मदतीचे धोरण स्वीकारले जाईल.शिरोळमध्ये पूरस्थिती गंभीरचशिरोळमधील १२ गावांना अजूनही पुराचा वेढा असून, त्यांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् येथून नौदलाचे एक पथक १२ बोटींसह येथे दाखल झाले. तालुक्यात शनिवारी पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरमधून अन्नाची तीन हजार पाकिटे पोहोचती करण्यात आली. 

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर