शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

दिलदार सनी लिओनी ! बेबी डॉलच्या दत्तक मुलीबद्दलची ही गोष्ट घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:35 IST

सनी लिओनीनं लातूर जिल्ह्यातून निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे. मात्र निशाबद्दलची ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत नसावी.

मुंबई, दि. 4 - बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीनं एका मुलीला दत्तक घेऊन आई होण्याची इच्छा पूर्ण केली आहे. आईच्या भूमिकेत आल्यापासून सनी फारच आनंदित आहे. आई होण्याचे प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवत असल्याचेही सनीनं सांगितले. काही दिवसांपूर्वी सनीनं दोन वर्षांच्या मुलीला लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले. या गोंडस मुलीचं निशा कौर वेबर असे नाव आहे.  

मात्र, निशाबद्दलची एक कदाचित कुणालाच माहिती नसावी. सनीनं निशाला दत्तक घेण्यापूर्वी जवळपास 11 अशा दाम्पत्यांना तिला नाकारले ज्यांना मुलं दत्तक घ्यायचे होते. मुलं दत्तक घेण्यासाठी कार्य करणारी संस्था CARA ( सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी )नं या वृत्ताला पुष्टी दिली आहे. मुलं दत्तक घेताना सर्वजण आरोग्य ते अन्य माहितीपर्यंत सर्व बाबतीत बराच विचार करतात आणि त्यानंतर मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतात.

CARA नं सांगितले की,''निशाचा रंग-रुप, तिची पार्श्वभूमी, आरोग्याची माहिती अन्य गोष्टींना अधिक महत्त्व न देता सनीनं तिला स्वखूशीनं दत्तक घेतले. या प्रक्रियेदरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारे नियम अथवा कायदा तोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि सर्वसामान्यांप्रमाणे तिनंदेखील निशाचा ताबा मिळवण्यासाठी प्रतीक्षा केली''.

सनीनं 30 सप्टेंबर 2016 रोजी मुलं दत्तक घेण्यासाठी CARAकडे ऑनलाइन अर्ज केला होता आणि 21 जून 2017 या दिवशी सनी आणि निशाची भेट घडवण्यात आली. सनीनं दुस-या दिवशीच लगेचच निशाला दत्तक घेण्यासाठी होकार दर्शवला कारण मुलं दत्तक घेण्यासाठी केवळ 48 तासांचा कालावधी दिला जातो. ''मी निशाचा फोटो ज्यावेळी पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा आनंद आणि भावूक झाले होते. पालकत्वासाठी नऊ महिन्यांची वाट पाहावी लागते. पण, आमच्या बाबतीत तीन आठवड्यांमध्ये हे सर्व काही निश्चित करण्यात आले’, अशी प्रतिक्रिया निशाला दत्तक घेतल्यानंतर सनीनं दिली होती.