शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
3
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
4
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
5
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
6
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
7
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
10
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
11
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
12
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
13
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
14
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
15
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
17
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
18
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
19
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
20
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?

प्रेमासाठी पोराला टाकून पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता चौकशीच्या फेऱ्यात अडकली! 'या' दिवसापर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:41 IST

तपासातील अधिकाऱ्यांनुसार, सुनीताने पाकिस्तानात वास्तव्यास असताना काही व्यक्तींशी संपर्कात राहत, विविध प्रकारची माहिती शेअर केली असण्याची शक्यता आहे.

नागपूरमधून लडाख फिरायला गेलेल्या महिलेने आपल्या १२ वर्षांच्या मुलाला गावातच सोडून सीमेपल्याड पाकिस्तानात पळून गेलेल्या महिलेला आता पाकिस्तानी रेंजर्सनी भारतात परत पाठवले आहे. मात्र, भारतात परतल्यानंतर आता ही महिला कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. भारतीय सुरक्षा दलाने सुनीताला नागपूर पोलिसांकडे सोपवले असून, आता तिला पोलिसांनी औपचारिकरित्या अटक केली आहे. 

बुधवारी रात्री सुनीताला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असतं, तिला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अमृतसर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, सदर प्रकरणाचा तपास सध्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू आहे. झोन ५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली.

अमृतसरहून नागपूरपर्यंतचा प्रवाससुनीता जमगडे यांना अटक केल्यानंतर नागपूर पोलिसांच्या चार सदस्यीय पथकाने अमृतसर पोलिसांकडून ताबा घेतला. सुनीताला घेऊन हे पथक मंगळवारी रात्री ट्रेनने दिल्लीमार्गे नागपूरकडे रवाना झाले. तत्पूर्वी, शनिवारी पाकिस्तान प्रशासनाने तिला अटारी सीमेवरून भारतीय सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांचा संशय आणि तपासाचा फोकसतपासातील अधिकाऱ्यांनुसार, सुनीताने पाकिस्तानात वास्तव्यास असताना काही व्यक्तींशी संपर्कात राहत, विविध प्रकारची माहिती शेअर केली असण्याची शक्यता आहे. विशेषतः झुल्फिकार आणि पास्टर या पाकिस्तानी नागरिकांशी झालेल्या संवादाबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

नागपूरहून कारगिल ते पाकिस्तानचा प्रवाससुनीता जमगडे ही नागपूरच्या संत कबीरनगर परिसरातील रहिवासी असून, तिने ४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासह कारगिल फिरण्याची योजना बनवली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, १४ मे रोजी तिने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे सीमा ओलांडण्यापूर्वीच तिने तिच्या मुलाला मागे सोडले होते. पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर सुनीताला तिथल्या सुरक्षा दलाने पकडले. अधिकृत कारवाईनंतर सुनीताचा ताबा भारताकडे सोपवण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता असून, जमगडे यांच्याशी संपर्कात असलेल्यांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानात गेल्यानंतर सुनीताने कोणाशी संपर्क साधला, किती काळ तिथे राहिली, आणि त्या काळात काय घडले, याची चौकशी होणार आहे.