शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सुनेने केला अंध सासऱ्याचा खून

By admin | Updated: July 15, 2014 01:16 IST

अंध सासऱ्याचे पालनपोषण करणे जीवावर आल्याने सुनेने चक्क सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडली.

कुऱ्हाडीचे घाव : दररोजच्या कटकटींमुळे सासऱ्याचे पालनपोषण करणे आले होते जीवावरढाणकी (यवतमाळ) : अंध सासऱ्याचे पालनपोषण करणे जीवावर आल्याने सुनेने चक्क सासऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडली. वसराम धनसिंग राठोड (७०) असे मृताचे नाव आहे. दोन्ही डोळ्यांनी अंध आणि वृद्ध असलेल्या सासऱ्याचे पालनपोषण करणे सून पंचफुला गणेश राठोड हिच्या जीवावर येत होते. नेहमी यावरून परिवारात खटके उडत. सासरा आणि सुनेतही नेहमी याच विषयावरून भांडण होत होते. रविवारी सायंकाळी याच कारणावरून सासरा आणि सुनेत ठिणगी पडली. काही कळायच्या आत पंचफुलाने घरातील कुऱ्हाड आणली आणि अंध सासऱ्याच्या गळ्यावर वार केला. आधीच क्षीण असलेला सासरा वसराम राठोड जागीच गतप्राण झाला. या घटनेचे वृत्त गावात समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपी पंचफुला हिला पकडून एका खांबाला बांधून ठेवले. या घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचफुलाला अटक करून तिच्याविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.नारळी तांडा येथे गणेश राठोड हा पत्नी व वडिलांसह राहतो. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र गणेशची पत्नी अत्यंत रागीट स्वभावाची आणि शीघ्रकोपी आहे. या रागाच्या भरातच तिने अंध सासऱ्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)