शहरं
Join us  
Trending Stories
1
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
3
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
4
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
5
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
6
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
7
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
8
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
10
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
11
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
12
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
13
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
14
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
15
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
16
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
17
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
18
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
19
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
20
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया

रविवार ठरला घातवार

By admin | Updated: May 16, 2016 04:57 IST

रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले.

मुंबई : रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले. तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यात अ‍ॅपे आॅटोला खडीने भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत नांदेडच्या १३ मजुरांसह १५ भाविक ठार व ३ जण गंभीर जखमी झाले़ तर, मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे शिवनेरी बस आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार तर चार जखमी झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील १८ मजूर आदिलाबादच्या निर्मलजवळील आडेली देवीच्या दर्शनाला आॅटोने जात असताना मध्यरात्री दहेगाव शिवारात समोरून येणाऱ्या टिप्परने (पान १० वर)(पान १ वरून) जोरदार धडक दिली़ त्यानंतर खडीने भरलेला हा टिप्पर उलटल्याने आॅटोचा चक्काचूरझाला. क्रेनच्या सहाय्यानेटिप्परला बाजूला करून मृतांना बाहेर काढले़यात गणपत आडेलू बाजेकर (५०), रतनबाई गणपत बाजेकर (४५), नरसिंग गणपत बाजेकर (३२), वंदना नरसिंग बाजेकर (३०), महानंदा दिलीप बाजेकर (२८), दीपा दिलीप बाजेकर (७), साई दिलीप बाजेकर (४),राजेश नरसिंग बाजेकर (२), शोभा राहुल बाजेकर (१९), प्रेम प्रल्हाद भालेराव (३), अर्चना सुरेश भालेराव (१०) ( सर्व जि़ नांदेड), प्रियंका गंगाधर दिवटेकर (१३) व आॅटोचालक बालू पोशट्टी संपागी (दोघेही तेलंगण), सुशीलाबाई बाबुराव गायकवाड (४५) व अर्जुन बाबुराव गायकवाड (११, दोघेही रा़ रामखडक, ता़उमरी, जि़नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर, राहुल गणपत बाजेकर (२२), दिलीप गणपत बाजेकर (३२), गंगाधर चन्ना ब्रम्हैया (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत़ लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठारराहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली़रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़ कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (४३), रचना जैन (४२), अर्चना शहा (४५, सर्व मध्य प्रदेश) व वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>शिवनेरी-कारचा अपघातमहाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे माणगाव तालुक्यातील रुद्रोली गावाजवळ पणजी-मुंबई शिवनेरी बस आणि एका मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांवर काळाने झडप घातली. डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय हे मंडणगड तालुक्यातील पेवे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोटारीतील संतोष तांबे (४३), स्वाती तांबे (३५), वृषभ तांबे (६), भिकूराम तांबे (७२) व प्रवीण पांडव (२९) मोटारचालक हे जागीच ठार झाले तर सूर्यकांत तांबे (४७), स्वप्निल तांबे (३५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.