शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गदा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, नवे शैक्षणिक वर्ष वेळेवरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:34 IST

पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे.

मुंबई/औरंगाबाद : एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकावरून शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालकांचा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने परीक्षा झाल्या नसतील अशाच शाळांनी एप्रिलअखेर शाळा सुरू ठेवाव्यात, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या किवा शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गदा न येता पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत ठेवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून २४ मार्च रोजी परिपत्रक काढून देण्यात आली. तसेच एप्रिलअखेर घेतलेल्या परीक्षांचा निकाल मे महिन्यात जाहीर करावेत, असेही त्यात नमूद केले आहे. मात्र, या सूचनांमध्ये बरीच संदिग्धता असल्याने शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांकडून याला विरोध करण्यात आला. या सूचना कोणत्या मंडळासाठी लागू आहेत? ज्या शाळांच्या परीक्षा पार पडल्या आहेत, त्यांनी काय करावे? उन्हाचा तडाखा असणाऱ्या विदर्भ मराठवाड्यातील शाळांनी काय व्यवस्था करावी, यासंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून याविरोधात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, हा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केवळ कोविड काळात काही कारणास्तव अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या शाळांसाठीच हे निर्देश असल्याचे स्पष्टीकरण दिले. शिवाय मे महिन्यात शाळा सुरू ठेवाव्यात, असे कोणतेही निर्देश परिपत्रकात नाहीत. त्यामुळे मुलांच्या सुट्ट्या कमी होणार नाहीत, असेही त्यांनी अधोरेखित केले. सुट्टीचा बेत रद्द करण्याची गरज नाही शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. -  अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक