लोणावळा : घाट माथ्यावरील पर्यटननगरी व थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराचा पारा सोमवारी ३६ अंशावर होता. शहर परिसरातील तापमान चाळिशीच्या उबंरठ्यावर असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेदेखील मुश्कील झाल्याने बाजारपेठा व रस्ते ओस पडल्याचे चित्र होते.या वर्षी राज्यात सर्वत्र कडक उन्हाळा जाणवत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. या कडक उन्हाळ्याच्या झळा पर्यटनाचे व थंड हवेचे प्रसिद्ध असलेले मध्यवर्ती लोणावळ्याला बसल्या आहेत. वातावरणातील बदल व नागरीकरणामुळे पारा ३६ अंशावर जाऊ लागल्याने रस्त्यांवर फिरणे मुश्कील झाले आहे. पर्यटकांच्या संख्येतदेखील यामुळे घट झाल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यवसायासह चिक्की, रिक्षा, लहान-मोठे विक्रेते, फेरीवाले या सर्वांना याचा फटका बसला आहे. दुपारी रस्त्यांवरून चालताना उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. वेळीच ही वाटचाल रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
उन्हाळ्याच्या झळा पर्यटननगरीतही
By admin | Updated: April 28, 2016 01:03 IST