शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

तासगावमध्ये सुमनताईच!

By admin | Updated: April 16, 2015 00:44 IST

मतांचा सहानुभूतीला कौल : भाजप बंडखोरासह विरोधकांची अनामत जप्त

सांगली / मुंबई : तासगाव-कवठेमहांकाळच्या पोट-निवडणुकीत बुधवारी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा तब्बल १ लाख १२ हजार ९६३ मतांनी विजय झाला. या मतदारसंघातील मताधिक्याचा हा विक्रम असून, त्यांच्या विरोधातील भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यासह अन्य सर्व अपक्षांची अनामत रक्कम जप्त झाली.आर. आर. पाटील यांच्या निधनाने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भावनिक वातावरण होते. पाटील यांच्या निधनाने दोन्ही तालुक्यातील त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राष्ट्रवादीने पाटील यांच्या पत्नी सुमनतार्इंना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी राष्ट्रवादी नेत्यांची अपेक्षा होती. त्यांच्या आवाहनानुसार सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतली होती, मात्र भाजपामधून स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी केली. ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक असल्याने ही बंडखोरी चर्चेत होती. शनिवार, दि. ११ एप्रिलला मतदान झाले होते. दोन लाख ६४ हजार २०४ मतदारांपैकी एक लाख ५५ हजार १८८ जणांनी मतदान केले होते. एकूण ५८.७४ टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी तासगाव येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मतमोजणी झाली. तेथे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या फेरीपासूनच सुमनतार्इंनी मोठी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. मतमोजणीच्या २२ फेऱ्या झाल्या. त्यात मतदानयंत्रातील मोजणीच्या २१, तर टपाली मतदानाच्या एका फेरीचा समावेश होता. सुमनतार्इंना १ लाख ३१ हजार २३६ मते, तर स्वप्नील पाटील यांना केवळ १८ हजार २७३ मते मिळाली. तासगाव तालुक्यातील चिंचणी हे भाजपाचे खासदार संजय पाटील यांचे मूळ गाव असल्याने तेथील मताधिक्याबाबत उत्सुकता होती. या गावातूनही सुमनतार्इंना १ हजार २२७ मताधिक्य मिळाले. आर. आर. पाटील यांच्या अंजनी गावातून तब्बल २0३५ चे मताधिक्य मिळाले. विरोधी उमेदवाराला अंजनीतून केवळ ३0 मते मिळाली. स्वप्नील पाटील यांना सावर्डे या स्वत:च्या गावातूनही मताधिक्य मिळू शकले नाही.विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीला फाटा देत हा विजय आर. आर. पाटील यांना समर्पित करण्यात आला.पोस्टाची केवळ ११ मते या निवडणुकीत केवळ ११ मतदारांनीच पोस्टाद्वारे मतदान केले. त्यात दोन मते बाद ठरली. उर्वरित नऊ मते सुमनतार्इंनाच मिळाली, तर उमेदवारांत पहिल्या तीनपैकी तिसरे उमेदवार प्रशांत गंगावणे यांना मिळालेल्या मतांपैकी ‘नोटा’ला जास्त पसंती मतदारांनी दिली. सुमनतार्इंनी गणरायाचे घेतले दर्शनमतमोजणी सभागृहाबाहेर पडल्यानंतर सुमनतार्इंनी तासगावचे आराध्य दैवत श्री गणपतीचे दर्शन घेतले. विजयाच्या घोषणा वगळता गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी कोठेही करण्यात आली नाही.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) आणि तासगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापले गड शाबूत राखले. किंबहुना, मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढीव मते घेऊन ते अधिक मजबूत केले. जिल्ह्यातील चौथ्या महिला आमदारसुमनताई पाटील या जिल्'ातील चौथ्या महिला आमदार आहेत. १९५२ मध्ये शिराळा मतदारसंघातून सरोजिनी बाबर आणि मिरजेतून श्रीमंतीबाई कळंत्रे (आक्का), तर १९८0 मध्ये सांगलीतून शालिनीताई पाटील निवडून आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३४ वर्षांनी सुमनतार्इंच्या रूपाने जिल्'ाला महिला आमदार लाभल्या आहेत. महिला आमदारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य सुमनतार्इंच्या नावावर नोंद झाले आहे. एकोणीस फेऱ्यांचा निकाल जाहीर केल्यानंतर सुमनताई पाटील मतमोजणी सभागृहात पोहोचल्या. तेव्हा त्यांना १ लाख ९ हजार ९६ मतांचे मताधिक्य होते. त्यांच्यासोबत आर. आर. पाटील यांचे बंधू सुरेश पाटील, राजाराम पाटील, कन्या स्मिता, सुप्रिया होते. सर्व कुटुंबीय एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.सुमनताई रावसाहेब पाटील १,३१,२३६स्वप्नील दिलीपराव पाटील १८,२७३प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे १,०६२अलंकृता अभिजित आवाडे-बिचुकले : ४४४सुभाष वसंत अष्टेकर : ६०८आनंदराव ज्ञानू पवार : ६१०धनंजय शिवाजी देसाई : ३६९विजय शंकर पाटील : १९३सतीश भूपाल सनदी : ६५७नोटा : १,४९५आधीचा तासगाव व नंतरचा तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ चुरशीच्या लढतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आर. आर. पाटील यांनाही दोनदा निसटत्या विजयाचा अनुभव घ्यावा लागला होता.मात्र २00९ च्या विधानसभा निवडणुकीत तासगावमधून ते ६५ हजार १७३ मतांनी विजयी झाले होते.हा त्यांचा व्यक्तिगत मताधिक्याचा विक्रम होता. यावेळी सुमनतार्इंनी आजवरचे या मतदारसंघातील सर्व विक्रम मोडीत काढले.जल्'ात आजवर सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम पतंगराव कदम यांच्या नावावर होता. २00४ च्या निवडणुकीत त्यांनी भिलवडी-वांगी मतदारसंघातून १ लाख १ हजार ९00 चे मताधिक्य मिळविले होते.आता सुमनतार्इंनी १,१२,९६३ चे मताधिक्य घेतले आहे.हा विजय सर्वसामान्यांचा मतदारसंघातील जनतेने आबांप्रमाणे माझ्यावरही विश्वास दाखवला. सर्व पक्ष, सर्वसामान्य जनतेचा हा विजय आहे. मी मतदारांची आभारी आहे. - सुमनताई पाटील