शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून बुलडाण्यातील शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: June 6, 2017 13:34 IST

आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. 6 -  राज्यातील शेतक-यांनी संपाची हाक देत रान उठवले आहे. आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  
 
सततची नापिकी व मुलीच्या लग्नाच्या ताणतणावामुळे  परतापूर येथील शेतकरी संजय रामराव घनवट यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. 
 
एकीकडे आपल्या हक्कासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेलेले असतानाच शेतकरी आत्महत्येची ही दुर्दैवी घटना घडली आहे.
संजय रामराव घनवट (वय ४६) यांच्याकडे तीन एकर शेती होती. यामधील काही शेती ही कोरडवाहू असून  गेल्या काही वर्षांपासून शेतात उत्पादन अतिशय कमी झाले होते. त्यामुळे संजय घनवट यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.  
 
घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घनवट यांच्याकडे पुरेसे पैस नसल्यानं ते मानसिक तणावात होते. या नैराश्यातूनच घनवट यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व सोमवारी (5 जून) पहाटे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 
या  घटनेमुळे परतापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तलाठी सानप व इतर कर्मचा-यांनी घटनास्थळावरुन जाऊन पंचनामा केला. 
(शेतकरी संपातील पहिली आत्महत्या, कर्जबाजारी तरुण शेतक-यानं संपवली जीवनयात्रा)
 
तर दुसरीकडे नाशिकमध्ये नवनाथ चांगदेव भालेराव या तरुण शेतक-यानंही आत्महत्या केली आहे.  ते 30 वर्षांचे होते. येवला तालुक्यातील पिंपरी येथील ते रहिवासी होते. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.  
(शेतकरी संप : झेड सुरक्षेत मुंबईत आणले दुधाचे टँकर्स)
 
धक्कादायक बाब म्हणजे,  गेल्या पाच दिवसांपासून पाटोदा (नाशिक ) येथे शेतकरी आंदोलनात भालेराव यांनी सक्रिय सहभाग घेतला. यानंतर सोमवारी ( 5 जून) मध्यरात्री भालेराव यांनी विष पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून भालेराव यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. 
 
1 जूनपासून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात नवनाथ भालेराव यांनी सहभाग घेऊन  शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी लावून धरली होती. 
 
नवनाथ हे एकत्रपद्धत कुटुंबात राहत होते. त्यांची संपूर्ण शेती वडिलांच्या नावावर असून त्यांनी आपल्या शेतात तीन वर्षापासून द्राक्ष बागेची लागवड केली होती. त्यासाठी वडिलांनी  नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिंपरी सोसायटीमार्फत 13 मे 2013 रोजी सुमारे 4,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. 
 
गेल्या वर्षी द्राक्षाचे पिक चांगले आले मात्र अस्मानी संकटामुळे हाताशी आलेले पिक गेले. तर यंदा द्राक्ष बागेवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न मिळाले नाही. द्राक्षबागेसाठी घेतलेल्या औषधांची उधारीही भालेराव यांच्यावर होती, अशी माहिती आहे.  
दरम्यान भालेराव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आईवडील व भाऊ असा परिवार आहे.